मोक्काच्या गुन्हयातील फरार शुभम कामठे पिस्तुलासह जेरबंद पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई लोणीकाळभोर पोलीस स्टेशन

ACS POLICE CRIME SQUAD WAJID S KHAN

महाराष्ट्र पोलीस लोणीकाळभोर पोलीस ठाणे , पुणे शहर . फोन नंबर ०२०-२६९ १३२६० प्रेसनोट ता .२३ / ०५ / २०२१ ( मोक्काच्या गुन्हयातील फरार शुभम कामठे पिस्तुलासह जेरबंद ) पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करणे तसेच मोक्का गुन्हयातील फरार आरोपी पकडण्याबाबत मा.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त व मा.डॉ.रविंद्र शिसवे , सह आयुक्त पुणे शहर यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत . दिनांक १७/०२/२०२१ रोजी इसम नामे रोहन इंगळे यावर आरोपी नामे व टोळी प्रमुख शुभम कैलास कामठे वय २६ वर्षे , रा मराठी शाळेचे मागे कदमवाकवस्ती , लोणीकाळभोर व त्याचे साथीदार यांनी धारधार कोयत्याने जिवघेणा हल्ला करून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला व दहशत निर्माण केली सदरबाबत हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद कमांक १५५/२०२१ भा.द.वि.कलम ३०७,३२३,५०६,१४३,१४९ , म.पो.का.कलम ३७ ( १ ) , १३५ , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) , मोक्का कलम ३ ( १ ) ( ii ) , ३ ( २ ) , ३ ( ४ ) अन्वये दाखल आहे.सदर गुन्हयातील टोळीप्रमुख शुभम कैलास कामठे हा गेले ३ महीन्यापासुन फरार राहुन पोलीसांना गुंगारा देत होता सदर आरोपी हा ता .२३ / ०५ / २०२१ रोजी पहाटे सोरतापवाडी ता.हवेली जि पुणे गावचे हददीत येणार असल्याची माहीती लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोना / अमित साळुखे व पोकॉ / निखील पवार यांना मिळाली . सदर बातमी बाबत त्यांनी वरीष्ठ अधिका – यांना माहीती दिली.त्यावरून मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांसह सोरतापवाडी येथे सापळा रचला असता मिळाले बातमीप्रमाणे आरोपी शुभम कैलास कामठे , वय २६ वर्षे , रा . मराठी शाळेच्या मागे , कदमवाकवस्ती , ता.हवेली , जि.पुणे हा सोरतापवाडी येथील गोल्डन ड्रिम्स लॉजचे समोर आला . परंतु त्याला तेथे पोलीसांची चाहुल लागताच तो पोलीसांना चकवा देवुन तेथुन पळुन जावु लागला असताना पोलीसांनी त्याचा मोठया शिताफीने पाठलाग करून त्यास काही अंतरावर पकडुन ताब्यात घेतले . त्याचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतुस जप्त करण्यात आलेले आहे त्याबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क .२८५ / २०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३ ( २५ ) म.पो.का.कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.सदर आरोपी शुभम कैलास कामठे याचेवर लोणीकाळभोर व हडपसर पोलीस स्टेशन येथे खुनखुनाचा प्रयत्न , गर्दी मारामारी अशा पकारचे गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत . सदरची कामगिरी मा.श्री.नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त ( पुर्व प्रादेशीक विभाग , पुणे शहर ) , मा.नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ , मा.श्री.कल्याणराव विधाते स.पो.आ. हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री राजेन्द्र मोकाशी , वपोनि , सुभाष काळे पोनि ( गुन्हे ) , लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी राजु महानोर सपोनि , दादाराजे पवार सपोनि , अमित गोरे पोसई यांचे सोबत पोहवा / नितीन गायकवाड , गणेश सातपुते , पोना / अमित साळुके , श्रीनाथ जाधव , सुनिल नागलोत , पोकॉ / , राजेश दराडे , दिगंबर साळुके , बाजीराव वीर , निखील पवार , शैलेश कुदळे , रोहीदास पारखे यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *