सायबर पोलीसांची दिल्ली येथे नायझेरीयन आरोपींना केली अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक- १५/०७/२०२१ सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर सायबर पोलीसांची दिल्ली येथे सलग तिसरी कारवाई गिफ्ट फ्रॉडमधील ०३ नायझेरीयन आरोपींना दिल्ली येथे केली अटक

ONLINE PORTAL NEWS 9822331526

एका खाजगी कंपनीमध्ये उच्चपदावर नोकरी करणा – या ६० वर्षीय महिलेची एका अज्ञात इसमाची फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण झाली होती . त्या इसमाने त्या महिलेस इंटरनेशनल फोनद्वारे संपर्क करुन एक महागडे गिफ्ट पाठवले असल्याची बतावणी केली , तो इसम महागडे गिफर घेवून तिचेकडे येत असतांना एअरपोर्ट येथे त्याला अडविले असून गिफ्टमधील सोन्याचे दागिने व फॉरेन करन्सी पार्सल क्लिअर करण्याच्या बहाण्याने , त्यानंतर त्या प्रकरणातील झालेल्या अटकेतून सोडविण्यासाठी , जेलमधून बाहेर काढणे आणि त्यास वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणेकरीता पैसे लागणार असल्याचे खोटे सांगून सदर महिलेस दि . २१ / ० ९ / २०२० ते मार्च २०२१ या कालावधीमध्ये आरोपींनी वेगवेगळया एकुण २५ बँकांमधील ६७ बँक अकाऊंट्स वर एकुण रक्कम रु . ३.९८,७५,५०० / – ( तीन कोटी अठ्यानो लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रु . ) भरावयास लावून सदर महिलेची आर्थिक फसवणुक केलेली होती .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

आपली आर्थिक फसवणुक झाल्याचे सदर महिलेच्या लक्षात येताच त्यांनी मा . श्रीमती भाग्यश्री नवटके , पोलीस उप आयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे , पुणे शहर यांना समक्ष भेटून हकीकत सांगितली . मा . नवटके मॅडम यांनी ताबडतोब सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सायबर पोलीस स्टेशन यांना सदर प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करुन पुढील तपास करणेबाबत आदेशित केले . लागलीच सदर महिलेची तक्रार सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल करुन घेवून सायबर पोलीसांनी गु.रजि.नं. १७/२०२१ . भा.दं.वि कलम ४१९ . ४२०,३८५ सह आयटी अॅक्ट क . ६६ ( सी ) . ६६ ( डी ) अन्वये गुन्हा दाखल केला .

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

वर नमूद अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्हयाचे तपासामध्ये सायबर पोलीसांनी केलेल्या तांत्रिक तपासाचे साहाय्याने या गुन्हयातील आरोपी हे नवी दिल्ली येथील असल्याचे निष्पन्न झाले .

मा . श्रीमती भाग्यश्री नवटके यांचे आदेशान्वये नवी दिल्ली येथे पाठविण्यात आलेल्या तपास पथकाने नमूद गुन्हयातील आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढून सदर ठिकाणी ०३ नायझेरीयन आरोपी पकडले . त्यांना काल सायंकाळी नमूद गुन्हयात दिल्ली येथे अटक करण्यात आलेली आहे . अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव

1 ) Jango Nicolas , Age 29 yrs . ,

2 ) Monday Okeke , Age 26 yrs . ,

3 ) Paulinus Mbanugo , Age 29 yrs . All R / o . H.NO. A – 49 / F / F , Khasra No. 17/10 , Phase 2 , Nilothi Extn . New Delhi – 110041 , Permanent Address Lagos , Nigeria अशी आहेत .

आरोपींकडून नमूद गुन्हयामध्ये वापरण्यात आलेले एकुण २३ मोबाईल हॅण्डसेट , ४ लॅपटॉप , १ हार्ड डिस्क , ५ डोंगल , ३ पेन ड्राईव्ह , ८ मोबाईल सिम कार्ड्स , ३ डेबिट कार्ड्स , आयडी कार्ड व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत ,

सदरची कारवाई श्री.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर , डॉ.रविंद्र शिसवे , सह पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री.अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , मा भाग्यश्री नवटके , पोलीस उपआयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे , श्री.मिलींद पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि.डी.एस.हाके , तपासी अधिकारी पो.नि.अंकुश चिंतामण , संगिता माळी , सपोनि गणेश पवार , पोउपनि अर्जुन बेंदगुडे , पोलीस अंमलदार अस्लम आत्तार , संदेश कर्णे , मंगेश नेवसे , योगेश वाहळ , नितेश शेलार , प्रविणसिंग राजपूत , शिरीष गावडे , प्रसाद पोतदार , अमोल कदम , संदीप यादव , श्रीकांत कबुले , महिला अंमलदार निलम साबळे , अंकीता राघो , उमा पालवे , पुजा मांदळे या पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली .

सदरचे पो.नि. चिंतामण व त्यांचे सहकारी गेले २ आठवडयापासून दिल्ली येथे तळ ठोकून असून त्या दरम्यान त्यांनी सायबर पोलीस स्टेशनमधील ०३ वेगवेगळया गुन्हयातील एकुण ०८ आरोपी व गुन्हयाची साधने ताब्यात घेतलेली आहेत . अशा प्रकारे ऑनलाईन पध्दतीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारे अनोळखी इसमांवर व बक्षिसाचे , नोकरीचे , लॉटरीचे , लोन मंजूर करण्याचे अमिष दाखवून पैसे भरावयास लावणा

या गुन्हेगारी टोळ्यांपासून नागरीकांनी सावध राहून अशा अमिषांना बळी पडू नये , अशा घटनांबाबत तात्काळ सायबर पोलीस स्टेशन , शिवाजीनगर , पुणे येथे संपर्क करावा , असे आवाहन करण्यात येत आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *