बेकायदेशीर तलवार व कोयते बाळगणाया आरोपीला कोंढवा पोलीस ठाणेकडुन अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – १४/०७/२०२१ कोंढवा पोलीस स्टेशन , पुणे शहर बेकायदेशीर तलवार व कोयते बाळगणाया आरोपीला कोंढवा पोलीस ठाणेकडुन अटक

CRIME REPORTER RAEES KHAN

दि .१३ / ०७ / २०२१ रोजी तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री पी.यु.कापुरे , तपास पथक अंमलदार कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सरदार पाटील , व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री शब्बीर सय्यद यांच्या सुचनाप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे व सुशिल धिवार यांना त्यांच्या बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की , शिवनेरीनगर भागातील रावडे बिल्डींगमध्ये राहणारा संजय पोले नावाचा इसम यांने बेकायदेशीरपणे तलवार व कोयते अशी हत्यारे गोळा करुन ठेवली आहे .

सदर मिळालेली बातमी तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री पी.यु.कापुरे , यांना कळविली . त्यांनी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांना कळविली असता त्यांनी योग्य ती कारवाईकामी करण्याबाबत आदेशित केले . तेव्हा तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री पी.यु. कापुरे , यांनी रावडे बिल्डींगमध्ये राहत असलेल्या १ ) संजय रोहिदास पोले , वय ३४ वर्षे , रा.रावडे बिल्डींग प्लॅट नं .०१ , रावडे कंपनीच्या पाठीमागे , शिवनेरीनगर , गल्ली नं .३१ , कोंढवा खुा पुणे यास त्याच्या रहाते घरातुन ताब्यात घेवुन त्याच्याकडे हत्याराबाबत चौकशी केली असता त्याच्या घरातील लाकडी पेटीतुन २ लोखंडी तलवार , २ लोखंडी कोयते , १ सुरा असा एकुण २१०० / – रुपये किंमतीचे हत्यारे मिळुन आली.सदर कोयते , तलवार , सुरा जवळ बाळगण्याचे कारण विचारले असता , परिसरात दहशत पसविण्यासाठी जवळ बाळगली असल्याचे त्याने सांगितले.तेव्हा सदर इसमा विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे ५७६/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ ) , सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ , पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस पोलीस उप निरीक्षक कापुरे हे करीत आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *