इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगून व लग्नाचे अमिष दाखविणाऱ्या भामटयास सायबर पोलीसांनी केली अटक .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक ० ९ / ०७ / २०२१ आंतरराष्ट्रीय नोकरीमध्ये इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगून व लग्नाचे अमिष दाखविणाऱ्या भामटयास सायबर पोलीसांनी केली अटक .
ONLINE PORTAL NEWS 9822331526
दि . ३०/०६/२०२१ रोजी एका महिलेने तिची स्वत : ची फसवणुक झाल्याची व्यथा सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे जावून मांडली असता , सायबर पोलीसांनी लागलीच नमूद महिलेची तक्रार नोंदवून घेतली . एका भामटयाने तो स्वत : इंटेलिजन्स अधिकारी असून आंतरराष्ट्रीय नोकरीत असल्याचे आणि स्वत : चे नाव राहुल पाटील असे असल्याचे सर्वांना सांगत होता .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
नमूद महिलेला त्याने लग्नाचे अमिष दाखवून तिचे सोबत मैत्री करुन स्वत : ची ओळख वाढविली होती आणि तिचेशी गोड बोलून महिलेचे मोबाईलमधील सिमकार्ड व अॅपल कंपनीचा १,२८,६१० / – रु . किंमतीचा लॅपटॉप घेवून फरार झालेला होता . जून महिन्यामध्ये त्याने नमूद महिलेचे बँक खात्यामधून ८,३७,००० / – रु . काढून घेतले होते . अशा प्रकारे महिलेची एकुण ९ , ६५,६१० / – रु.ची फसवणुक करुन तो फरार झालेला होता .
ONLINE PORTAL NEWS 9822331526
सायबर पोलीसांनी नमूद महिलेची तक्रार लागलीच त्यांचेकडे नोंदवून तांत्रिक तपास करुन चतु : शृंगी पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गु.रजि.नं. ३०६/२०२१ भा.द.वि. कलम ४०६,४२०,१७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . नमूद गुन्हयाचे तपासामध्ये , सायबर पोलीसांनी केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारे भामटा आरोपी राहुल पाटील हा रामती येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने
मा . श्रीमती भाग्य नवटके , पोलीस उप आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे , पुणे शहर यांचे आदेशान्वये त्यास त्वरीत नमूद गुन्हयात अटक करणेबाबत आदेशित केले . त्यानंतर सायबर पोलीसांचे एक पथक बारामती येथे रवाना करण्यात आले होते . भामटयाने स्वत : चे नाव लपविले असल्याने त्याचा शोध घेणेकरीता सायबर पोलीसांनी अथक परिश्रम करुन भामटयाचे खरे नाव निष्पन्न केले . त्याचे खरे नाव अमित आप्पासाहेब चव्हाण , रा . बारामती एमआयडीसी असे असून तो त्याचे सासरवाडीत राहत असल्याची माहिती मिळाल्याने त्यास त्याचे सासरवाडीमध्ये जावून सायबर पोलीसांमार्फत ताब्यात घेण्यात आले .
त्याचे ताब्यातून एम.एच. ५० / एल . ४०८१ सिलव्हर ग्रे कलरची ब्रिझा गाडी जप्त करण्यात आली असून आरोपीस त्याचे गाडीसह चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे ताब्यात देवून आरोपीस वर नमूद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे . त्याचेकडे पोलीसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपी भामटयाने अशाच प्रकारे तीन ते चार महिलांची फसवणुक केल्याचे निदर्शनास येत आहे . चतु : श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सदरची कारवाई मा.श्री.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर , मा.श्री रविंद्र शिसवे , आयुक्त , पुणे शहर , मा.श्री . अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , मा . भाग्यश्री नवटके , पोलीस उपआयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे , मिलींद पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे , यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि. डी.एस.हाके , चौकशी अधिकारी पोउपनि रुपाली पवार , पोना किरण जमदाडे , पोशि शिरीष गावडे , प्रसाद पोतदार , अनिल पुंडलिक , आनंद भंडलकर आणि मपोशि राणी काळे या पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली .
अशा प्रकारे सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मुला – मुलींशी ओळख करुन त्यांचेशी मैत्री वाढवुन गुन्हे करणारे गुन्हेगारांपासुन सावध राहण्याबाबत तसेच वैयक्तीक व गोपनीय ठेवण्याजोगी माहिती कोणत्याही अज्ञात इसमास शेअर न करणेबाबत सायबर पोलीस स्टेशन , शिवाजीनगर , पुणे यांचेकडुन आवाहन करण्यात येत आहे .
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526