खंडणीखोर टोळीला पुणे शहर पोलीस आयुक्ताचा दणका ‘मोक्का अंतर्गत कारवाई.चंदननगर पोलीस स्टेशन ,ची मोक्का अंतर्गत कारवाई.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चालू वर्षात ५१ वी व एकूण ११४ वी मोक्का कारवाई आहे.

चंदननगर पोलीस स्टेशन , पुणे शहर संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करून खंडणी घेणारा कोंढवा भागात राहणारा टोळी प्रमुख आरोपी नामे आसेफ ऊर्फ आसिफ ईस्माईल खान , वय २३ वर्षे व त्याचे एकुण ०५ साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ ( मोक्का ) अंतर्गत कारवाई .

पुणे,दि.१३:- पुणे शहरांतील कोंढवा परिसरात संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करुन खंडणी मागणार्‍या कोंढवा येथील आसेफ खान व त्याच्या ५ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोक्का) अंतर्गत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केली आहे़ .

टोळीप्रमुख आसेफ ऊर्फ आसिफ ईस्माईल खान (वय २३), इरफान हसन भोला (वय २५, रा. पर्वती, मुळ रा. विजापूर, कर्नाटक), शहाबाज मेहमुद खान (वय ५०, रा. संतोषनगर, कात्रज), समीर मेहबुब शेख (वय ३६, रा. संतोषनगर, कात्रज), फरियाज हसनखान पठाण (वय ३२, रा. संतोषनगर, कात्रज) आणि जॉन अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

आसेफ खान यांच्या टोळीवर खराडीतील आय टी पार्कमधील कंपनीच्या मालकाला धमकावून खंडणी घेतल्याचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. खान हा त्याच्या सहा साथीदारांना वेळोवेळी बदलून बरोबर घेऊन चंदननगर, तसेच करमाड, औरंगाबाद ग्रामीण या पोलीस ठाण्यात त्यांच्यांविरुद्ध दरोडा व खंडणी मागणे असे गुन्हे दाखल आहेत.स्वत: व टोळीचे सदस्यांना अवैध मार्गाने आर्थिक लाभ करुन गंभीर गुन्हे वारंवार संघटितपणे करीत आहे.
त्यामुळे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत मोक्का प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. चव्हाण यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव अधिक तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक जग्गनाथ जानकर, सहायक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे, उपनिरीक्षक अरविंद कुमरे ,पोलीस अंमलदार राजेश नवले, रामचंद्र गुरव, नाना पतुरे, सागर तारु, अनुप सांगळे यांनी केली आहे
.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *