ससून हॉस्पिटल मधील पार्किंग ठेकेदाराविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
पुण्यातील ससून हॉस्पिटल मधील पार्किंग ठेकेदाराविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
२ तासांपर्यंत ५ रूपये पार्किंग शुल्क असताना आकारले जाते १० रूपये.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ऑपरेशन “
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ( ACS ) प्रतिनिधी,
पुणे रेल्वे स्टेशन जवळील ससून हॉस्पिटलमध्ये येणा-या नागरिकांकडून पार्किंग ठेकेदार दुप्पट शुल्क आकारत असल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे.
ससूनमध्ये विविध ठिकाणांहून गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यात आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील रुग्णांचा भरणा जास्त असतो. असे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वाहनतळ ठेकेदार करारापेक्षा दुप्पट वाहनशुल्काची वसुली करीत असल्याचे समोर आले आहे.
ठेकेदाराने किती शुल्क आकारावे याचे बोर्ड सुध्दा लावल्याचे दिसून आले नाही. तसेच २ तासांपर्यंत फक्त ५ रूपये घेणे करारनाम्यात व पावतीवर नमूद असूनही ठेकेदार दहा-पंधरा मिनिटांचे १० रूपये घेत असल्याचे व्हिडिओ मध्ये आले आहे.
पार्किंग ठेकेदार बोलताना व्हिडिओ
सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी ५ डिसेंबर २०२१ रोजी या संदर्भात शुल्क घेणा-याकडे माहिती घेतली असता १० रूपयेच असल्याचा पवित्रा त्याने घेतला होता, त्या पावतीवरील मजकूर त्याला दाखवून दिल्यानंतर ५ रूपये जास्त घेतलेले शुल्क परत दिले.
त्या संदर्भात
अँटी करप्शन स्क्वॉड(एनजीओ) राष्ट्रीय अध्यक्ष वाजिद एस खान.
यांनी ससून हॉस्पिटलमधील अधिका-यांकडे तोंडी तक्रार केली होती. तक्रार करूनही अवाजावी शुल्क आकारले जात असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष वाजिद एस खान. यांनी पुणे सिटी टाईम्स शी आणि ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ऑनलाइन पोर्टल बातम्या संपर्क साधले,
तर ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड प्रतिनिधीने समक्ष आज पाहणी केली असता पुन्हा १० रूपये पार्किंग शुल्क आकारले असता त्या संदर्भात ठेकेदाराकडील कामगाराला १० रुपये किती तासांचे आकारताय,तर तो म्हणाला तुम्ही १ तास, अर्धातास किंवा अर्ध मिनिटे वाहन पार्किंग केले तरी दहा रूपये द्यावेच लागतील.
या संदर्भात अँटी करप्शन स्क्वॉड(एनजीओ) राष्ट्रीय अध्यक्ष वाजिद एस खान. यांनी ससून हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून संबंधित ठेकेदाराविरूध खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ससून रुग्णालयाकडून संबंधितांविरुद्ध कारवाई झाली नाही तर अवाजावी शुल्क नागरिकांकडून आकारले गेल्या प्रकरणी ससून विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असे राष्ट्रीय अध्यक्ष वाजिद एस खान. यांनी सांगितले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.