खुनाच्या गुन्ह्यातून ८ वर्षानंतर निर्दोष सुटला आणि बेकायदेशीर पिस्टल स्वसंरक्षणार्थ जवळ बाळगलेने गुन्हे शाखेकडुन अटक .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
खुनाच्या गुन्ह्यातून ८ वर्षानंतर निर्दोष सुटला आणि स्वसंरक्षणार्थ पिस्टल जवळ ठेवून फिरताना पोलीसांच्या जाळ्यात अडकला,
गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. (ACS) प्रतिनिधी,
८ वर्षांपूर्वी गोळ्या घालून खून केलेल्या प्रकरणातून निर्दोष सुटला असता स्वसंरक्षणार्थ बेकायदेशीरपणे पिसटल घेऊन फिरत असताना गुन्हे शाखा युनिट १ ने एकाला अटक केली आहे.
गुन्हे शाखा पथकातील पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे यांना बातमी मिळाली की ८ वर्षापुर्वी पप्पु तावरे (रा. जांभळी गांव ता. हवेली जि. पुणे) निळकंठेश्वर पायथ्याजवळ जांभळी गांव येथे रुपेश तावरे, माऊली तावरे या गजा मारणे टोळीतील ७ ते ८ जणांनी मिळुन टोळीचे वर्चस्वाचे कारणा वरुन पिस्टल मधुन गोळ्या झाडुन व कोयत्याने गंभीर मारहाण करुन खुन केला होता.
त्या बाबत हवेली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद होता. त्यामध्ये सर्व आरोपींना अटक झाली होती. त्यामध्ये सर्वजण जामिनावर सुटले होते परंतु माऊली तावरे यास जामिन झाला नव्हता सुमारे १ महिन्यापुर्वी दाखल गुन्हयातील आरोपींना निर्दोष सोडल्याने दिनांक २५ डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तावरे यास येरवडा जेल येथुन सोडले होते.
त्याला विरोधी पार्टीचे सदस्य मर्डर करतील या भितीने स्वसंरक्षणार्थ तो पिस्टल सारखे हत्यार जवळ बाळगुन पासोडी धायरी पुणे येथे फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांना सांगितली ,
वरिष्ठांना माहिती देवुन पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी यांना आदेशित केले त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, अशोक माने, शशिकांत दरेकर, विजयसिंग वसावे, रुक्साना नदाफ यांनी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली पांडुरंग तावरे याची पंचासमक्ष अंगझडती घेतली.
असता झडती मध्ये त्याचे पँन्टमध्ये कंबरेस धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह मिळुन आले. त्याची मॅगझीन काढून पाहता त्यामध्ये २ जिवंत काडतुसे मिळुन आले. या बाबत पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांनी तक्रार दिल्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे.
ACS
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त , डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , श्री . रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . शैलेश संखे , पोलीस उपनिरीक्षक , सुनिल कुलकर्णी , संजय गायकवाड पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे , अनिकेत बाबर , राहुल मखरे , अशोक माने , शशिकांत दरेकर , विजयसिंग वसावे , रुक्साना नदाफ यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad