Traffice Police

खडक’ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपायुक्तांची ‘कडक कारवाई ! मटका किंग ‘नंदू’च्या बाजारावर छापा, 35 जणांना पकडले


‘खडक’ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपायुक्तांची ‘कडक कारवाई ! मटका किंग ‘नंदू’च्या बाजारावर छापा, 35 जणांना पकडले
Jan 20, 2021

पुणे : खडकच्या हद्दीत रस्त्यावरच मटका किंग ‘नंदू’च्या फुललेल्या बाजारावर रात्री उपायुक्तांनी धाडसत्र केले. धाडसत्रात तबल 35 जणांना पकडले असून पावणे दोन लाखांचा ऐवज मिळाला. विशेष 15 ते 20 जण पळून गेले अन्यथा येथून 55 ते 60 जणांना पकडण्यात आले असते, अशी माहिती मिळाली आहे. नंदूचा रस्त्यावरच बाजार फुलला तो कोणाच्या सांगण्यावरून असा प्रश्न आता सुरू झाला आहे. गावभर कारवाई करणाऱ्या खडकच्या पोलिसांना हद्दीतच मटका सुरू असल्याचे कसे कळले नाही, अशीही चर्चा आता सुरू आहे.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात निलेश रणपिसे, आझाद तांबोळी, छगन उजगरे, संतोष आयणापुरे, महंमद शेख, राजकुमार रोहरा, आनंद चव्हाण, भारत शिलवंत, नंदकुमार परदेशी, राजेश शेळके, सूरज साळुंखे, भरत दगडे, संतोष साखरे, बाळू निली, शाहजी गायकवाड, श्रीधर देवदास, मनिशकुमार ठाकूर, राजेंद्र खुळे, कृष्णा चव्हाण, सूर्यकांत बडगुजर, रोहितकुमार राऊत, नितीन राक्षे, कुमार चव्हाण, महेश पवार, रवींद्र राजपूत, शुभम मिश्रा, सुनील पोळ, अनिल खिलारे, रमेश नाईक, प्रमोद भोसले, राजीव कुसाळ, अमन गायकवाड, चंद्रकांत निरगुडे, मेहबूब मुजावर, मेहताब शेख अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येथून 1 लाख 66 हजार तसेच मोबाईल व इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकारी देत आहेत. पोलीस आयुक्त स्वतः लक्ष केंद्रित करत यावर कारवाई करत आहेत. पण स्थानिक पोलीस मात्र मर्जीने वागत असल्याचे दिसत आहे. दरम्यान झोन एकच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांना येथील मटका सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार समर्थ पोलीस ठाण्यातील प्रोबेशनरी उपनिरीक्षक व विश्रामबाग पोलिसांच्या पथकाला याठिकाणी छापा टाकण्याची सूचना केली. रात्री अचानक पथकाने येथे छापा टाकला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तबल 35 जणांना पोलिसांना पकडण्यात यश आले. पण गर्दीच इतकी होती की, 15 ते 20 जण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘नंदू’चा मटका कोणाच्या आशिर्वादाखाली सुरू होता आणि त्याने इतक्या बिंदास सुरू ठेवला कसा असे आता बोलण्यात येत आहे. दरम्यान कारवाई गेलेल्या पथकाला तेथील चित्र पाहून आश्चर्य वाटत होते. कारण ही गर्दी मंदिरापर्यंत आल्याचे सांगण्यात आले आहे.

सांगून देखील दुर्लक्ष..

काही दिवसापासून हा मटका जुगार सुरू होता. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भर मिटिंग आणि वेगवेगळ्या प्रकारे दोन ते तीन वेळा संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी सांगत असताना त्यांना न जुमानता ही ‘डेरिंग’ कोणाच्या जीवावर केली जाते असे, खासगीत पोलीस आता बोलु लागले आहेत.


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *