पुणे शहर परिसरांतून ती वाहने पुण्याचे बाहेरील विक्री करणारे आरोपीला वानवडी तपास पथक ने केली अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे शहर परिसरांतून ती वाहने पुण्याचे बाहेरील विक्री करणारे आरोपीला वानवडी तपास पथक ने केली अटक

वानवडी तपास पथक ची कामगिरी सतर्कतेने पेट्रोलिंग करीत असताना पो .अंम .सर्फराज देशमुख व निलकंठ राठोड यांनी आरोपीला केली अटक.

सराईत चोरांना वानवडी पोलीसांनी केले जेरबंद ,त्यांचेकडुन चोरीच्या तब्बल ११ दुचाकी केल्या जप्त .

बानवडी पो.स्टे . पुणे दि . २३/०७/२०२२ वाहनचोरी करणा – या चार सराईत चोरांना वानवडी पोलीसांनी केले जेरबंद ,त्यांचेकडुन चोरीच्या तब्बल ११ दुचाकी केल्या जप्त .

वानवडी पोलीस ठाणेचे तपास पथक प्रभारी सहा .पोलीस निरिक्षक जयवंत जाधव ,पोउनि भोसले व पो.अंम संतोष नाईक , सर्फराज देशमुख ,विनोद भंडलकर ,निलकंठ राठोड असे पोलीस ठाणे हद्दीत वारंवार घडत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करुन गुन्हेगारांना अटक करणेबाबत मा.वरिष्ठ अधिकारी यांनी वाहन चोरीचे हॉट स्पॉट तयार करुन सदर ठिकाणी सापळे लावणेबाबत दिलेल्या सुचना व आदेशान्वये सतर्कतेने पेट्रोलिंग करीत असताना पो . अंम . सर्फराज देशमुख व निलकंठ राठोड

त्यांना त्यांचे बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की , काही तरुण पुणे शहर परिसरांतून वाहन चोरी करून ती वाहने पुण्याचे बाहेरील जिल्हयांत त्याची विक्री कामी नेणार असलेले मिळालेले बातमीवरुन वानवडी पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर भागांत सापळा रचून खालील आरोपींताना ताब्यांत घेवुन अटक करण्यात आलेली आहे .

१ ) सुरज श्रीकांत कांबळे , रा . तरवडेवस्ती , महंमदवाडी चौकीचे मागे , महंमदवाडीरोड , पुणे . सध्या . मु.पो. कानाडी बोरगाव , ( मांगवाडा ) ता . लातुर , जि . लातुर .

२ ) गणेश बबन लोंढे , रा . तरवडेवस्ती , महंमदवाडी चौकीचे मागे , महंमदवाडीरोड , पुणे

३ ) अनिकेत ऊर्फ मॉन्टी शरद माने , रा . धनलक्ष्मी सुपर मार्केट शेजारी , साठेनगर चौक , तरवडे वस्ती , महंमदवाडी , पुणे .

४ ) भिमाशंकर ऊर्फ भिमा हरिभाऊ लाळगे , रा . घर नं .०६ , गल्ली नं .०३ , आनंदनगर , तरवडेवस्ती , महंमदवाडी , पुणे वरील आरोपींना वानवडी पो.स्टे.गु.रजि.नं .१५३ / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९ , ३४ गुन्हयांत अटक करून नमूद आरोपींनी चोरी केलेली एकुण ३,०१,००० / – रु.कि.चे ११ वाहने जप्त केलेली आहेत .

त्याबाबत दाखल असलेले वानवडी पोलीस ठाणेकडील ४ गुन्हे , हडपसर पोलीस ठाणेकडील २ गुन्हे व कोंढवा पोलीस ठाणेकडील २ गुन्हे तसेच मुरुड पोलीस ठाणे जिल्हा लातुर येथील १ गुन्हा असे एकुण ९ गुन्हे उघडकीस आणले असुन २ वाहनांबाबत अधिक तपास चालु आहे . सदरचे आरोपी १ व ४ हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी वाहनचोरी व शरिराविरुध्दचे अनेक गुन्हे दाखल आहेत . तसेच आरोपी क्र ३ अनिकेत ऊर्फ मॉन्टी शरद माने हा मोका मधुन जामीनावर सुटलेला असुन त्यास पुणे शहरात येण्यास बंदी आहे . तसेच आरोपी क्र ४ भिमाशंकर ऊर्फ भिमा हरिभाऊ लाळगे हा कोंढवा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११०० / २०२१ भा.दं.वि. कलम ३९३,३४१,५०४,३४ आर्म अॅक्ट ४ ( २५ ) .३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ या गुन्हयामध्ये अटक होता .

सदरची कारवाई ही मा .नम्रता पाटील सो , पोउआ परिमंडळ ५ पुणे शहर व मा .पौर्णिमा तावरे सोो ,स.पोआ. वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिपक लगड ,पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील सहा पोलीस निरीक्षक जयवंत जाधव ,पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले , सहा.पो.फौज .संतोष तानवडे ,पो.अंम अमजद पठाण , संतोष नाईक , विनोद भंडलकर ,अतुल गायकवाड ,सर्फराज देशमुख ,महेश गाढवे , राहुल गोसावी , निलकंठ राठोड , संदीप साळवे , अमोल गायकवाड , विष्णु सुतार यांनी केली आहे .तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले हे स्वतः करीत आहेत .

दिपक लगेड वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो.स्टे.पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *