पुणे महानगर पालिकेतील उप अभियंता ४० हजाराची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात ,
ACS POLICE CRIME SQUAD
दि .२३ / ०८ / २०२१ पुणे म.न.पा. रस्ते विभागाच्या उप अभियंत्यावर लाच स्वीकारले प्रकरणी कारवाई
पुणे महानगर पालिकेतील उप अभियंता ४० हजाराची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात ,
शिवाजीनगर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे . पुरूष , वय – ३९ वर्षे आरोपीचे नाव
( सुधीर विठ्ठलराव सोनवणे ), वय – ५१ वर्षे , पद – उप अभियंता , वर्ग -२ , रस्ते विभाग , पुणे महानगरपालिका . मागणी केलेली लाचेची रक्कम ५०,००० / – ( पन्नास हजार रूपये ) स्वीकारलेली लाच रक्कम ४०,००० / – ( चाळीस हजार रूपये ) , दिनांक २३/०८/२०२१ सापळा ठिकाण व दिनांक – पुणे मनपा पार्किंगचे आवारात दि . २३/०८/२०२१ यातील तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून त्यांनी सन २०१८ – २०१९ मध्ये केलेल्या शाळेच्या दुरूस्तीचे कामांचे बील पास नसल्यामुळे लोकसेवक सुधीर सोनवणे यांना ते भेटले असता बील मंजुर करणे व यापुर्वी दुस – या कामाचे बील मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांचेकडे ५०,००० / लाचेची मागणी करून त्यापैकी ४०,००० / – रुपये लाच रक्कम स्वीकारल्यावर त्यास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून , शिवाजीनगर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास भारत साळुखे , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट हे करत आहेत .
सदरची कारवाई मा . पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक श्री . राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , श्री . सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री . राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .
१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ (२.) ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४,२६१३२८०२ , २६०५०४२३ (३). व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३( ४). व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९ ७७००. (५) ई – मेलआयडी- पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in (६.) फेसबुकपेज- www.facebook.com – maharashtraACB (७). वेबसाईट- www.acbmaharashtra.gov.in
( श्रीहरी पाटील ) सहायक पोलीस आयुक्त / पोलीस उप – अधीक्षक ( प्रशासन ) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526