खंडणी वसुली पोलीस उपनिरीक्षकाला अटक. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित .

ACS POLICE CRIME SQUAD

खंडणी वसुली पोलीस उपनिरीक्षकाला अटक. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित .

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय

पोलीस केले तातडीने निलंबित पोलीस गणवेशात येऊन मुंढवा भागातील तीन हॉटेलमधून खंडणी वसूल करणान्या पोलीस उपनिरीक्षकाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केल्यानंतर आता मुंडवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मिलन कुरकुटे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे .

दिनांक २५/०८/२०२१ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यास त्वरीत प्रभावाने निलंबित केलेबाबत

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष येथे नेमणुकीस असलेले पोलीस उप निरीक्षण मिलन कुरकुटे हैं दिनांक २१/०८/२०२१ रोजी पासुन रुग्णनिवेदन रजेवर होते . परंतु दि . २४/०८/२०२१ रोजी ते रूग्णनिवेदन कालावधीमध्ये असताना देखील त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील मुंढवा पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल कार्निव्हल येथे शासकीय गणवेशासह जावुन तेथील हॉटेल मालक व मॅनेजर यांचेशी हुज्जत घालून पैशाची मागणी केली याबाबतची माहिती मुंढवा पोलीस ठाणे , पुणे शहर यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय येथे कळविण्यात आल्यानंतर मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश यांनी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांना त्यांच्या या पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणान्या अशोभनीय कृत्याबद्दल त्वरित प्रभावाने निलंबित केले आहे .

तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश यांनी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांचेवर भारतीय संविधान अनुच्छेद ३११ , २ ( ब ) अन्वये सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *