माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

| माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. सकाळी ६ वाजता मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती आहे. अचानक छापेमारी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीने छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. आज (बुधवार) पहाटेच्या ईडीने छापे (ED Raid) टाकले आहेत. सुमारे २६ अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरु केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर गर्दी केली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक आणि हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रकाश गाडेकर यांच्याही घरावर ईडीने छापा टाकला आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरी यापूर्वीही आयकर आणि ईडीने छापे टाकले होते. त्यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रारी केल्या आहेत.

पुण्यातील मालमत्तांवर छापेमारी.

ईडीने बुधवारी सकाळी मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर छापे टाकले.
पुण्यातील कोंढवा येथील अशोका मुज सोसायटी आणि गणेशखिंड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
कोंढवा भागात मुश्रीफ यांचे नातेवाईक राहायला आहेत. तसेच मुश्रीफ यांच्या कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांवर देखील ईडीने छापे टाकले आहेत.

काही महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते. 2020 साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रा. लि.
कंपनीला चालवण्यास दिला.या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केली होता.

Web Title :- Hasan Mushrif | enforcement directorate raid ncp leader hasan mushrif home in kagal and pune policeNamanews.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *