घराची वाट चुकलेले जेष्ठ नागरिक सुखरुप कुटूंबिया समवेत”मुंढवा पोलीस ठाणेची कामगिरी,apcs.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

घराची वाट चुकलेल्या जेष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियाची भेट !

पुणे: मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस उप-निरीक्षक,शुभांगी मगदुम व स्टाफ पायी पेट्रोलींग करीत असतांना एक वयवृद्ध जेष्ठ नागरिक आस्थाव्यस्त फिरत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावेळी त्या जेष्ठ नागरिकांला मायेने विचारपूस करत मदत हवी आहे अशी विचारणा केली.त्यावेळी त्यांचे डोळे भरुन आले. एकही शब्द न बोलता त्यांनी होकारर्थी मान हलविली. त्यानंतर पोलिसांना त्यांना ताब्यात घेवून अधिक चौकशी त्यांच्या कुटूंबियांची भेट घडवून आणले.

 

कमरुद्दीन रसुल इमानदार ( वय ६६ रा. ॲमेनॉरा पार्क) असे ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस उप – निरीक्षक शुभांगी मगदुम आणि पोलीस कर्मचारी पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी त्यांना एक वयवृद्ध जेष्ठ नागरिक वय अंदाजे ६६ वर्षे हे मुंढवा- घोरपडी रोडवरुन जात असतांना ते आस्थाव्यस्त, हुरहूरल्यागत फिरत असल्याचे दिसले. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक मगदुम यांनी आजोबांच्या जवळ जावून मायेने मदत हवी आहे, काय याबाबत विचारणा केली. त्यावेळी आजोबा हे काहीएक न बोलता, फक्त पाहतच राहिले, व त्यांचे डोळे पाणावले. तेव्हा त्यांना खरच मदत हवी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांची चौकशी करुन नाव पत्ता विचारता त्यांनी ॲमेनॉरा पार्क एवढेच सांगितले. त्यांच्याकडे अचुक ओळख पटविण्याकरीता मोबाईल फोन, ओळखपत्र, नाव-पत्ता याबाबत काहीएक चिज वस्तू नसल्याने पुढील कार्यवाही करीता मुंढवा पोलीस चौकीत आणले. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना दिली असता, ते सांगत असलेल्या भागामध्ये नातेवाईकांचा शोध घेण्याच्या सूचाना देण्यात आल्या.

पोलिसांनी इमानदार यांचे समुपदेशन करुन “काळजी करण्याची काहीएक गरज नाही, आपले कुटूंबातील व्यक्तींचा शोध घेवून तुम्हाला सुखरुप घरी सोडू ” असे बोलून आधार दिला. पोलिसांकडून शोध घेतला जात असताना इमानदार यांचा मुलगा सुरज कमुद्दीन इमानदार  (वय २९ वर्षे) याची माहिती समोर आली. त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेत इमानदार यांची ओळखून पटवून खात्री झाल्याने त्यांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले.

सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, आर. राजा, परिमंडळ-५, पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलीस उप-निरीक्षक, शुभांगी मगदुम, पोलीस अंमलदार, नवनाथ कोकरे, निलेश पालवे, पुनम लाड व इतर स्टाफ यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *