पुणे आरटीओ कार्यालयात राडा;टॅक्सी संघटनांच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे आरटीओ कार्यालयात राडा टॅक्सी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर केशव क्षीरसागर, अजय मुंढे यांच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल,
पुणे :आरटीओत तुंबळ हाणामारी करत, राडा घालणार्या टॅक्सी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात तोडफोड, आरडाओरड करत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणे, सरकारी कार्यालयातील वस्तुंचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले होते नेमके?
शुक्रवारी (दि.23) रोजी पुणे आरटीओ कार्यालयातील ओला-उबेरला नवे दर लागू करण्यासंदर्भातील बैठक सायंकाळी 5 च्या सुमारास पार पडली. त्यानंतर आरटीओ अधिकारी येथील रूममधून बाहेर पडले. त्यानंतर उपस्थित संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात आपापसांतच जुंपली. यादरम्यान कार्यालयातील वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुणे आरटीओ कार्यालयातील सहायक मोटार वाहन कक्षाच्या समोरील कॉन्फरन्स रूममध्ये, समोरील परिसरात केशव क्षीरसागर व त्यांचे 10 ते 12 साथीदार आणि अजय मुंढे व त्यांच्यासोबत असलेले 5 ते 6 साथीदारांनी आपासांत वाद घालून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग केला. तसेच, येथील कॉन्फरन्स रूममधील टेबल पार्टीशनच्या काचेचे नुकसान केले. यामुळे केशव क्षीरसागर, अजय मुंढे व त्याच्या साथीदारांवर कलम 160, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in