घरफोडीचे गुन्हे करणा-या ३ आरोपीतांना २४ तासात खडकी पोलिसांनी केली अटक,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
खडकी : दिनांक २६/०२/२०२४ खडकी पोलीस स्टेशन पुणे स्टेशन,
आंतर जिल्हा घरफोडीचे गुन्हे करणा-या अट्टल ०३ आरोपींना खड़की पोलीसांनी २४ तासात जेरबंद करत चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपीनकडुन हस्तगत केला.
यातील फिर्यादी यांचे राहते घर कुलुप लावुन बंद असताना सदर घराचे कडी कोयंडा तोडुन आतमध्ये प्रवेश करुन २,७०,०००/- रु. कि.चे. सोन्याचे दागिने व ३,५००/- रु रोख रक्कम चोरी केलेबाबत फिर्याद यांनी फिर्याद दिलेने खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं ७९/२०२४ भादवी कलम ४५४,३८०, दि २२/०२/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशन तपासपथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक आण्णा गुंजाळ व स्टाप असे सदर घटनास्थळ परीसरात सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन तसेच गोपनिय बातमीदारामार्फत बातमी काढली तसेच पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे यांना त्यांचे खास बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदर घरफोडी करणारे आरोपी हे तालुका कराड जि. सातारा येथे चोरी केलेल्या माल विक्रीकरीता घेवुन गेले असलेबाबत माहिती मिळाल्याने सदरबाबत.

मा. वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिलेने कराड जि. सातारा येथे जावुन बातमीप्रमाणे खात्री करुन आरोपीचा माग काढुन कराड येथुन आरोपी नामे १) अनिल संजय बुट्टेवार वय २८ वर्षे रा, बर्गे वस्ती, चिंबळी गांव, चाकण पुणे २) रोशन अरविंद सोनावले वय २६ वर्षे रा. सदर ३) संदिप हरी इंगळे , वय ३६ वर्षे रा. सदर यांना ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देवुन चोरीचा मुद्देमाल इसम नामे दत्तात्रय भीमराव पवार वय ४३ वर्षे रा. कपील गोलेश्वर पंचायत टाकीजवळ तालुका कराड जि. सातारा याचेकडे दिलेबाबत सांगितल्याने सदर इसमांचा शोध घेवुन त्यास देखील ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेले मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन तसेच अॅटो रिक्षा क्र एम. एच १४ एच एम ७८६२ ही जप्त करण्यात आलेली आहे.
सदर आरोपीकडुन गुन्ह्यातील चोरीस गेले रु १,७०,०००/- रु सोन्याचे दागिणे व गुन्ह्यात वापरलेले १०,००,०००/- रु.चे चारचाकी स्कार्पीयो तसेच १,००,०००/- रु. कि, चे, एक अॅटो रिक्षा असे एकुण १२,७०,०००/- रु.कि.चा. मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेली आहे . सदर आरोपीतांना गुन्ह्याचे पुढील आधिक तपासकामी अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग श्रीमती आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन श्री. गिरीक्षकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ, पोलीस उपनिरीक्षक तानाजी कांबळे पोलीस अंमलदार उध्दव कलंदर, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रताप केदारी, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in