2 लाखांची लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता अॅन्टी करप्शनच्या ताब्यात,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
अॅन्टी करप्शनच्या पुणे घटकाकडून महावितरणच्या बंडगार्डन विभाग, पुणे येथील कार्यकारी अभियंता यास लाच मागणी व लाच स्विकारले प्रकरणी ताब्यात घेतले.
थोडक्यात माहिती: यातील तक्रारदार हे शासन मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार आहेत. त्यांनी त्यांचे ओळखीचे व्यावसायिकांच्या ५ नविन इमारतीसाठी इलेक्ट्रिक डीपी उभारुन सप्लाय चालू करुन देण्याचे काम घेतले होते. त्यासाठी त्यांनी ५ फाईल तयार करुन मंजुरीसाठी लोकसेवक भाऊसाहेब सावंत यांच्या महावितरण कार्यालय, बंडगार्डन विभाग, पुणे येथे दिलेल्या होत्या.
प्रलंबित असलेल्या ५ फाईलवर कार्यवाही करण्यासाठी तसेच मांजरी येथील नवीन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून ५ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन त्यापैकी २ लाख रुपये स्वीकारताना महावितरणचे कार्यकारी अभियंता याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१) असे या कार्यकारी अभियंताचे नाव आहे. याबाबत एका विद्युत ठेकेदाराने तक्रार केली होती़ त्यांनी त्यांच्या ओळखीचे व्यावसायिकांच्या ५ नवीन इमारतीसाठी इलेक्ट्रिक डी पी उभारुन सप्लाय चालू करुन देण्याचे काम घेतले होते. त्यासाठी त्यांनी ५ फाईल तयार करुन मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत यांच्या बंडगार्डन येथील महावितरण कार्यालयात दिलेल्या होत्या. तसेच तक्रारदार यांनी मांजरी येथील एका नवीन इमारतीच्या ठिकाणी उभारलेल्या डी पीवर भाऊसाहेब सावंत याच्याकडून वीज भार मंजूर करुन घेऊन सप्लाय चालू करुन दिला आहे.सावंत याच्याकडे तक्रारदार यांच्या वरील प्रलंबित असलेल्या ५ फाईलवर कार्यवाही करण्यासाठी आणि तक्रारदार यांनी मांजरी येथील नवीन इमारतीसाठी उभारलेलया डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून सावंत याने तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागा पुणे येथे दिली होती. सदर तक्रारदार यांच्या प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक भाऊसाहेब सावंत यांनी तक्रारदाराच्या वरील प्रमाणे प्रलंबित असलेल्या ५ फाईलवर कार्यवाही करण्यासाठी व तक्रारदाराने मांजरी येथील नविन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून ५,००,०००/- (पाच लाख) रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न होवून, आज दि. २३/१०/२०२४ रोजी तक्रारदाराकडे एकुण मागितलेल्या लाच रक्कमेपैकी अॅडव्हान्स म्हणून २,००,०००/- (दोन लाख) रुपये लाच रक्कम लोकसेवक भाऊसाहेब सावंत यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्विकारले असता त्याना ताब्यात घेण्यात आलेले असून, त्यांचेविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.पोलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करीत आहेत.
१) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
