गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा अटक केली.
गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा अटक केली.
मुंढवा पो स्टे गु र न 389/2024 बी एन कलम 65(2), 137(2), 140(2) बालकाचे लैगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 12 अन्वये दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे विजय स्वामी बामु वय 35 वर्ष रा घोरपडी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता,
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळ्खून वरिष्ट यांनी शोध घेण्यास सांगितले होते.चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून पसार झालेल्या नराधमास गुन्हे शाखेच्या पो शि विक्रांत सासवडकर यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने लागलीच पो हवा खरपुडे पो हवा गोसावी पो शि संदीप येळे यांच्या समवेत मुंढवा रेल्वे पुला खाली जाऊन दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली,
दोन दिवसांपासून पोलीस आरोपीच्या मागावर होते.विजय स्वामी बामू (४०, रा. घोरपडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बामू याने मानलेल्या बहिणीच्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी मुंढवा भागात घडली होती. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल झाला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत होते. गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पथक हद्दीत गस्तीवर असताना गुन्ह्यातील आरोपी हा मुंढवा रेल्वे पुलाखाली येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विक्रांत सासवडकर यांना मिळाली.त्यानुसार पोलीस निरीक्षक नंदकुमार बीडवई यांच्या मार्गदर्शनाखाली छबू बेरड, अंमलदार दत्तात्रय खरपुडे, संदीप येळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पुढील तपासासाठी आरोपीला मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर ची कामगिरी मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.शैलेश बलकवडे सो , मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री.निखिल पिंगळे सो, मा. सहा.पोलीस आयुक्त गुन्हे (2) श्री. राजेंद्र मुळीक सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शना खाली सहा पोलीस निरीक्षक सी बी बेरड,पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, गणेश गोसावी,विक्रांत सासवडकर, संदीप येळे, यांनी केली आहे.