कोंढवा खुर्द शिवनेरी नगरमध्ये बेकायदेशीर इमारतीवर PMC ची कारवाई,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंढवा खुर्द शिवनेरी नगरमध्ये बेकायदेशीर इमारतीवर PMC ची कारवाई,
पुणे : कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर १२ येथे उभारण्यात आलेल्या P+6 मजली अनधिकृत बांधकामावर आज पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली.

सदर बांधकाम कोणत्याही प्रकारच्या नियमांची परवानगी न घेता करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने जागेवर पोहोचत संबंधित मजल्यांचे तोडकाम सुरू केले.

स्थानिक नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अवैध बांधकामांवर अशा प्रकारे कारवाई सुरूच राहील, असा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.

