फरासखाना ची कामगिरी सातारा जिल्हा येथील खुनाच्या गुन्हेगार ला अटक .

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक – ०२ /०९/२०२१ फरासखाना पोलीस स्टेशन , पुणे शहर फरासखाना पोलीसांनी फलटण पोलीस स्टेशन , जिल्हा सातारा येथील खुनाच्या गुन्हया मध्ये फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळुन त्यास फलटण पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेबाबत …

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक ०१/०९/ २०२१ रोजी फरासखाना पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी अभिजीत पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक , व पोलीस अंमलदार वैभव स्वामी , राकेश क्षीरसागर , ऋषीकेश दिघे , समीर माळवदकर , सचिन सरपाले व समर्थ पोलीस स्टेशनकडील व सध्या मा.सहाय्यक पोलीस आयुक्त सो , फरासखाना विभाग , पुणे यांचेकडील मोक्का स्कॉड मध्ये कर्तव्यास असलेले पोलीस अंमलदार शाम सुर्यवंशी हे मा.वरीष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पाहीजे आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शाम सुर्यवंशी यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , फलटण पोलीस स्टेशन , सातारा जिल्हा गुन्हा रजि.नंबर ३६७/२०२१ भादंवि कलम ३०२,३६४,३६३,१२० ( ब ) , ३४ या गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे राकेश रमेश निंबोरे , रा.मु.पो.साखरवाडी , ता.फलटण , जिल्हा सातारा हा धायरीगाव , विजयनगर बस स्टॉपवर उभा असुन त्याने अंगा मध्ये एक पांढरे रंगाचे टी शर्ट व काळे रंगाची ट्रक पॅन्ट घातलेली असुन त्याचे केस मोठे आहेत . त्यानुसार वरील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार हे धायरीगाव , विजयनगर बस स्टॉपवर गेले असता आरोपी राकेश रमेश निंबोरे , वय -२५ वर्षे , रा.मु.पो.साखरवाडी , ता.फलटण , जि.सातारा हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करता फलटण पोलीस स्टेशन , सातारा जिल्हा यांचे ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे शहर , श्री.राजेंद्र डहाळे , मा . पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -१ पुणे , डॉ.प्रियंका नारनवरे , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे , श्री.सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र लांडगे , फरासखाना पोलीस स्टेशन पुणे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील , पोलीस अंमलदार शाम सुर्यवंशी , वैभव स्वामी , राकेश क्षीरसागर , ऋषीकेश दिघे , समीर माळवदकर , सचिन सरपाले यांच्या पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *