पुण्यात बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालक आणि संघटना पदाधिकाऱ्यांवर FIR,.बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा दाखल.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुण्यात बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालक आणि संघटना पदाधिकाऱ्यांवर FIR, ३७ रिक्षा चालक आणि पदाधिकाऱ्यांना अटक.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा संघटनांनी पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर केलेल्या ठिय्या आंदोलनाविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनामध्ये आरटीओ कार्यालयाच्या रस्त्यावर रिक्षा संघटनेकडून चक्काजाम करण्यात आला होता. वाहतुकीचा बोजवारा उडवल्यामुळे आंदोलनकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी ‘रिक्षा बंद’चा फटका नागरिकांना सोमवारी बसला.

पुण्यात बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालक आणि संघटना पदाधिकाऱ्यांवर FIR, ३७ रिक्षा चालक आणि पदाधिकाऱ्यांना अटक.ण्यात गेले अनेक दिवस दुचाकी टॅक्सी सेवेच्या विरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन सुरु आहे. दुचाकी टॅक्सी बंद करण्यात याव्या, या मागणीसाठी पुण्यातील ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने २८ नोव्हेंबर रोजी रिक्षा बंद पुकारला होता. या बंदला इतर रिक्षा संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर पुण्यातील ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने पुन्हा १२ डिसेंबर रोजी रिक्षा बंद आंदोलन केले होते. आता या आंदोलनात सहभागी झालेल्या ३७ रिक्षाचालक आणि संघटनांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या आंदोलनाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, बाहेरगावी जाणारे व येणारे प्रवासी यांना बसला.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपिडो बाईक टॅक्सी बंद करण्यासाठी ‘बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समिती’ने पुण्यात १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून बेमुदत बंद पुकारला होता. हे बेकायदेशीर आंदोलन करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या ३७ रिक्षाचालक आणि रिक्षा संघटनांवर कारवाई करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

हे आंदोलन होऊ नये म्हणून ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर, आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे आनंद अंकुश, पुणे जिल्हा वाहतूक सेवा संघटनेचे संजय कवडे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अशोक साळेकर, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे किशोर चिंतामणी, आरपीआय वाहतूक आघाडीचे अजीज शेख, पी आशीर्वाद रिक्षा संघटनेचे फारूक बागवाले, एआयएमआयएम रिक्षा संघटनेचे बाबा सय्यद, शिवा वाहतूक संघटनेचे शिवा भोगनळी आणि इतर रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह परिमंडळ-परिमंडळ-२ पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील सहायक पोलीस आयुक्त आर एन राजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते यांनी बैठक घेऊन आवाहन केले होते.

पोलिसांनी केलेल्या आवाहनाला सकारात्म प्रतिसाद देत महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाबा कांबळे यांनी आंदोलनात सहभाग घेतला नाही. मात्र इतर पदाधिकारी आंदोलनावर ठाम राहिल्याने त्यांना सी आर पी सी कलम १४९ प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

रिक्षा चालक संघटनांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते.पण दुचाकी टॅक्सी अ‍ॅप काढून न टाकल्याने रिक्षा संघटनांनी १२ डिसेंबर रोजी आरटीओ चौकात चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
यांनी ही दुचाकी टॅक्सीवर कारवाई सुरु असल्याची माहिती दिली होती.पण रिक्षाचालक संघटनांनी त्याच्या निर्णयावर ठाम राहून संगम पुलाजवळील आर टी ओ चौकात ठिय्या आंदोलन करून चौकातील वाहतूक रोखली.

रिक्षा चालकांनी त्यांच्या रिक्षा मुख्य रस्त्यावर पार्क करुन शालेय विद्यार्थी, शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांना तेथून प्रवास करण्यास मज्जाव करत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर दगडफेक करुन दहशत निर्माण केली. त्यावेळी बंदोबस्तसावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न
केला असता त्यांच्या अंगावर धावून जाऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

त्यामुळे, आंदोलन न करण्याच्या सूचना दिल्या असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी 143, 145, 147, 149, 353, 336, 342, 177 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट , 7, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम
अन्वये गुन्हा दाखल करुन ३७ रिक्षा चालक आणि रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *