महाराष्ट्र भाजप पदाधिकाऱ्यास मारहाण करणारे ‘ ते ‘ पोलीस उपनिरिक्षकसह पाच जणांना तडकाफडकी निलंबित केले आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

WAJID S KHAN 9822331526

जालना भाजप युवा मोर्चा पदाधिकारी शिवराज नारियलवले यांना काठी तुटेपर्यंत पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती . हा प्रकार माध्यमांसह भाजप नेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी उचलून धरत दोषी पोलिसांविरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी केली . दरम्यान 24 तास उलटत नाही तोच जालना जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलीस उपनिरिक्षकसह पाच जणांना तडकाफडकी निलंबित केले आहे . त्यामुळे पुन्हा पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे . याप्रकरणी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यामार्फत चौकशी सुरू होती . अखेर शुक्रवारी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम , पोलीस कर्मचारी सोमनाथ लहानगे , नंदकिशोर ढाकणे , सुमित सोळंके , महेंद्र भारसाकळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत . दरम्यान या व्हिडियोमध्ये दिसणारे निलंबीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून उद्या त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे . काय आहे प्रकरण ? काय आहे प्रकरण ? जालना । डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप करत महिनाभरापूर्वी एका रुग्णालयात जाब विचारणारे भाजपच्या सरचिटणीस शिवराज नारियलवाले जालना पोलिसांनी लाठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केली होती . हा प्रकार गुरुवारी समोर आला आहे . या अमानुष मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे . त्यात नारियलवाले ‘ साहेब माफ करा ‘ , साहेब माफ करा अशी विनवणी करत असतानाही जवळपास पाच ते सहा पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठ्यानी त्यांना मारहाण करत आहेत . शिवराम नारियलवाले यांच्या एका नातेवाईकाच्या अपघात झाला होता . तेव्हा रुग्णालयात त्या नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . मात्र , डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत काही तरुणांनी रुग्णालयात महिनाभरापूर्वी गोंधळ घातला होता असे पोलिसांचे म्हणणे आहे . लाचेच्या प्रकरणात अटक झालेले तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आणि कदिम जालना ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठ्यांचा तुफान मारा केला . भाजपचे कार्यकर्ते रुग्णालयात धुडघूस घालत असल्यानेच त्यांना अटकाव करण्यासाठी हा लाठीमार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे . –

ACS POLICE CRIME SQUAD

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

WAJID S KHAN

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *