बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली वाहन तोडफोडीतील अज्ञात आरोपीना ४८ तासात केली अटक .
ACS POLICE CRIME SQUAD
वाहन तोडफोडीतील अज्ञात आरोपीना ४८ तासात केली अटक .
पुणे शहरात वारंवार विविध भागात वाहन तोडफोडीचे गुन्हे घडत असताना बिबवेवाडी भागातील सुपर इंदिरानगर परिसरातील रिक्षा व मोटारसायकलची ०८ ते ० ९ जणांच्या अज्ञात टोळक्याने हातात धारदार शस्त्र घेउन दहशत माजवत तोडफोड करण्याचा प्रकार दि .२४.०५.२०२१ रोजीच्या रात्री १०.३० वा.चे सुमारास घडला होता.सदर घटनेच्या प्राप्त सी.सी.टी.व्ही . फुटेजमध्ये आरोपी व त्यांनी वापरलेल्या गाड्या स्पष्ट दिसुन येत नसतानाही तसेच आरोपी बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील किंवा अभिलेखावरील नसतानाही अप्पर व सुप्पर परिसरातील प्रत्येक भाग पिंजुन काढुन अनेक लोकांकडे चौकशी करुन तपास पथक प्रभारी श्री राजेश उसगांवकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन सुखसागर कात्रज भागातील ०५ महाविदयालयीन विदयार्थी असलेल्या विधीसंघर्षित वालकांना ताब्यात घेतले असुन दोन मुख्य आरोपी नामे १.साहिल राजु देशमुख वय १८ वर्षे रा.साईनगर लेन नं .३ कात्रज पुणे ४११०४६ २.मंगेश उर्फ डुल्या राकेश सावंत वय २२ रा.गुरुकृपा कॉलनी साईनगर कात्रज पुणे ४११०४६ यांना ४८ तासांच्या आत अटक केली आहे . त्यांचेकडुन दोन धारदार कोयते व तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत . पुढील तपास पोलीस उप – निरीक्षक यश बोराटे हे करीत आहेत . सतत घडणा – या सदरच्या वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये प्रामुख्याने १८ वर्षे वयाखालील शालेय व कनिष्ठ महाविदयालयीन मुलांचा सहभाग दिसुन येतो.तरी पालकांना अवाहन करण्यात येत आहे की , त्यांनी आपल्या मुलांची संगत , त्यांचे आचरण याचेवर विशेष लक्ष द्यावे . सदरची कारवाई ही परिमंडळ ०५ चे पोलीस उपायुक्त मा.नम्रता पाटील , वानवडी विभागाचे सहा.पोलीस आयुक्त श्री.राजेंद्र गलांडे , बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री.राजेश चं.उसगांवकर , पोलीस अंमलदार महेश जाधव , अमित पुजारी , सतिश मोरे , तानाजी सागर , अतुल महांगडे , अमोल शितोळे , दिपक लोधा व राहुल कोठावळे यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD 9822331526