Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक ६ मोबाईल १ अॅक्टीव्हा जप्त,मार्केटयार्ड पोलीस स्टेशनची कामगिरी”apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

प्रेसनोट क्रमांक

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर

दि.२२/०२/२०२४,

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक ०६ मोबाईल व ०१ अॅक्टीव्हा असा एकुण ९५,१००/- रुपयाचा माल जप्त ,मार्केटयार्ड पोलीस स्टेशनची कामगिरी

मार्केटयार्ड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, पुणे याने आंबेडकरनगर परीसरात एका इसमास सुरा दाखवुन मोबाईल व रोख रक्कम चोरी केली असुन मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४/२०२४ भा.द.वि.कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्केटयार्ड पो.स्टे च्या हाद्दीत मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केटयार्ड पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रातील शिवजयंती निम्मीत्त मिरवणुक असल्याने रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, चेक करणेकामी मा. वपोनि साो, यांचे दिमतीत तपास पथकातील सपोनि कांबळे, पोहवा ३४५३ थोरात, पोना ७५५४ जाधव, पोअं ८२३५ गायकवाड, पोअं २३९२ यादव, पोअं १०४६४ झायटे यांचेसह रात्री २०/०० वा खाजगी वाहनाने मार्केटयार्ड पो.स्टे च्या हाद्दीत रवाना झालो. आम्ही आपापले वाहनाने मार्केटयार्ड मधून रिक्षा स्टॅन्ड येथे पेट्रोलींग करीत जात असताना पोअं ८२३५ गायकवाड यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, हा शारदा गजानन मंदिरा शेजारील पान टपरी शेजारी उभा असल्याची बातमी मिळाली असता सदरची बातमी ही आम्हास सांगितली असता आम्ही सदरची बातमी ही मा. वपोनि साो, मार्केटयार्ड पो.स्टे. पुणे यांना कळविली असता, त्यांनी सदर बातमीची खात्री करुन कारवाई करणे बाबत तोंडी आदेश दिल्याने आम्ही शारदा गजानन मंदिरा शेजारी आड बाजुस उभे राहुन पाहणी केली असता, बातमी प्रमाणे प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या हा पान टपरी समोर उभा असल्याचे दिसल्याने आम्ही त्याचे दिशेने जात असताना त्याची व आमचे नजरानजर झाली असता.

तो आम्हास पाहुन पळुन जात असताना त्यास आम्ही थोड्याच अंतराव पकडले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, पुण्चो असे सांगितले असुन त्याचे कडे दाखल गुन्हयाबाबत तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दाखल गुन्हयात २१.४५ वा. खालील कारणास्वत अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील आरोपीची पोलीस कस्टडी घेवुन त्यास अधिक विश्वासात घेता आरोपी प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, याने ८५,०००/- रु कि ०६ मोबाईल, १०,०००/- रु किं, ०१ अॅक्टीव्हा मोपेड व १००/- रु किं चा सुरा असा एकुण ९५,१००/- रु किं चा माल पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे. सदर अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एमएच १२ जे.एच ५८९७ बाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथील गुन्हयाचा अभिलेख तपासला असता वरील वर्णनाचे अॅक्टीव्हा चोरी बाबत मार्केटयार्ड पो.स्टे. गु.र.नं. २६७/२०२३ भा.द. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन दोन गुन्हे उघड करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. श्री अमितेष कुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री प्रविण पवार साो, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री मनोज पाटील साो, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री आर. राजा साो, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री गणेश इंगळे साो, मा. सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने तपास पथकाचे सपोनि मदन कांबळे, सोबत पोहवा ३४५३ थोरात, पोना ७५५४ जाधव, पोअं ८२३५ गायकवाड, पोअं २३९२ यादव, पोअं १०४६४ झायटे यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *