नोकरीचे अमिष देवुन ऑनलाईन १० / – रुपयांचे ट्रान्छेक्शन करायला सांगुन ३,०७,२१७ / – रूपयांची फसवणुक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक -१३ / ०७ / २०२१ सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर नोकरीचे अमिष देवुन ऑनलाईन १० / – रुपयांचे ट्रान्छेक्शन करायला सांगुन ३,०७,२१७ / – रूपयांची फसवणुक

CRIME REPORTER RAEES KHAN

सहा.पोलीस निरीक्षक श्री.गणेश पवार यांचे तत्परतेमुळे फिर्यादीला पुर्णपणे रक्कम परत मिळवुन दिले बाबत दिनांक ०७/०७/२०२१ रोजी फिर्यादी यांना त्यांचे मोबाईल वर आरोपीने ( अज्ञात ) व्यक्तीने फोन करुन दुबई येथील जुलेखा हॉस्पीटल येथे जॉब लावुन देतो असे सांगुन आरोपींनी फिर्यादीला एक ऑनलाईन फार्म भरावा लागेल असे सांगितले .

त्यांनतर आरोपीनी फिर्यादीला सुरुवातीला रजिस्ट्रेशन फी म्हणुन १०/ – रुपये भरावे लागतील असे सांगुन आरोपीने फिर्यादीचे मोबाईल वर एक लिंक पाठविली , सदर लिंक फिर्यादीनी ओपन केली , त्यामुळे फिर्यादी यांचे मोबाईल मध्ये एनीडेस्क व एस.एम.एस.फॉरवर्डर हे दोन अॅप डाऊनलोड करण्यास सांगीतले . आरोपींचे सांगणे प्रमाणे फिर्यादी यांनी १० / – रुपये रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर फिर्यादी यांचे डेबिटकार्ड व्दारे एकुण ३,०७,२१७ / -रुपयांचे ट्रान्झेक्शन झाल्याने फिर्यादी यांची फसवणुक झाल्याचे त्यांचे लक्षात आल्याने फिर्यादी तक्रार देण्यासाठी तात्काळ सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे आले . सायबर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले सहा . पोलीस निरीक्षक श्री.गणेश पवार यांना सदरचे फिर्यादी भेटले व झालेला सर्व प्रकार सांगीतला असता सहा.पोलीस निरीक्षक श्री . गणेश पवार यांनी सदरचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन , कार्य तत्परता दाखवुन फिर्यादी यांचेकडुन मिळालेल्या माहीतीवरुन वेगवेगळ्या २ पेमेंट मर्चेट यांचेशी विनाविलंब पत्रव्यवहार करुन संबंधीत पेमेंट मर्चेटचे नोडल ऑफीसर यांचेशी संपर्क साधुन फिर्यादीचे अकाऊंड वरुन झालेले फ्रॉड ट्रान्झेक्शन थांबविणे बाबत कळविलेने सदरचे पेमेंट मर्चट यांनी पोलीसांना तात्काळ प्रतिसाद दिल्याने फिर्यादी यांचे अकाऊंट मधुन गेलेले एकुण ३,०७,२१७ / – रुपये पुन्हा फिर्यादीचे अकाऊंटमध्ये वळविण्यात पोलीसांना यश आले .

सदरची कामगिरी ही मा.पोलीस उप – आयुक्त श्रीमती भाग्यश्री नवटके , मा.सहायक पोलीस आयुक्त श्री . मिलींद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.डी.एस.हाके सहा , पोलीस निरीक्षक गणेश पवार , मपोशि.उमा पालवे , मपोशि . पुजा मांदळे यांनी केली आहे . अवाहन – पुणे शहरामधील सर्व नागरीकांना सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर यांचेकडुन अवाहन करण्यात येतेकी , अशा प्रकारे कोणाचीही फसवणुक झाल्यास तात्काळ ( Golden Hours ) सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे संपर्क साधावा . तसेच कोणाचेही सांगणेवरुन मोबाईल क्लोन अॅप डाऊनलोड करु नका . कोणत्याही अनाधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करु नये तसेच मोबाईलवर आलेला ओटीपी , क्रेडीट – डेबीट कार्डचे नंबर कोणासही शेअर करु नका . सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर.फोन नंबर – ०२० – २ ९ ७१०० ९ ७ मोबाईल नंबर ७०५८७१ ९ ३७१ / ७०५८७१ ९ ३७५ ई – मेल- crimecyber.pune@nic.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *