वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका चारआरोपी मोक्का कायद्यान्वये कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – १३/०७/२०२१ वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका गुन्हयातील सक्रीय टोळी प्रमुख आरोपी यांचेवर मोक्का कायद्यान्वये कारवाई

ONLINE PORTAL NEWS 9822331526

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं .१९१ / २०२१ , भा.द.वि.कलम ३०७,३८७,१२० ( ब ) , ३४ , क्रि.लॉ . अमें अॅक्ट क .७ , आर्म अॅक्ट क .४ ( २५ ) , म.पो.अधि.क .३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ या गुन्हयातील टोळी प्रमुख पाहिजे आरोपी ( १ ) नकुल शाम खाडे यांनी आपल्या ३ साथीदारांनी दि .०५ / ०६ / २०२१ रोजी ० ९ .०० वा.चे सुमारास स.नं ६९ / ५ / अ / १ अन्वी ग्रिन्स डुक्कर खिंड जवळ , कोथरुड , पुणे येथे दोन मोटारसायकलवरून येवून फिर्यादी यांचेवर स्वयंचलीत पिस्टल मधून ५ वेळा गोळीबार केला . त्यापुर्वी एक महिना अगोदर टोळी प्रमुख नकुल खाडे यांनी फिर्यादी श्री रविंद्र तागुंदे यांना ५ लाख रूपये खंडणी मागीतलेली होती . ती न दिल्याने टोळी प्रमुख त्याचे साथीदारांनी फिर्यादी व साक्षीदारांकडे गोळीबार करून चांदणी चौकाचे दिशेने पळून गेले होते .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक १ व २ यांना अटक करण्यात आली असून आरोपी क्रमांक ३ व ४ हे पाहिजे आरोपी आहेत .

१.अभिजित ऊर्फ चोख्या तुकाराम येळवंडे , वय २४ वर्ष रा . काकडे पॅलेस शेजारी , जाधव चाळ कर्वेनगर पुणे .

२.उमेश श्रीराम चिकणे , वय २८ वर्षे , रा . शांतीनगर कोथरुड , पुणे.

३.नकुल शाम खाडे , रा.पवारनगर ग.नं .२ कडु बिल्डींग , जुनी सांगवी पुणे सध्या धनंजय म्हाडा वसाहत , कोथरुड , पुणे.

४.चेतन चंद्रकांत पवार रा .३ / ४ , फ्लॅट नं .३५ , मेगासिटी एस.एन.डी.टी जवळ पुणे .

अटक आरोपी क्रमांक १ व २ यांचेकडून एक नोकीया कंपनीचा मोबाईल , एक पिस्टल , जुपीटर गाडी , घटनास्थळावरील पुगळ्या , सिम कार्ड , आरोपी यांचे अंगावरील कपडे , इत्यादी जप्त करण्यात आले आहेत . आरोपी नकुल शाम खाडे , रा.पवारनगर जुनी सांगवी , पुणे सध्या रा.धनंजय म्हाडा वसाहत , कोथरुड पुणे हा सन २०१२ पासून पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असुन त्याने बेकायदेशीर मार्गाने अवैध आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने गुन्हयातील साथीदार आरोपी व अन्य सदस्यांना बरोबर घेवून स्वतःचे अधिपत्याखाली आपली संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन केलेली आहे .

ONLINE PORTAL NEWS

त्याने टोळीतील वेगवेगळे साथीदार सदस्यांना बरोबर घेवुन खुन , खुनाचा प्रयत्न , खंडणी , मारामारी , गैरकायदयाची मंडळी , बेकायदेशीर घरात घुसने , नुकसान करणे , गंभीर दुखापत करणे , घातक शस्त्र जवळ बाळगणे , शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्ये सातत्याने चालु ठेवलेली असुन आपल्या संघटित गुन्हेगारी टोळीचे अस्तित्व , वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दहशत पसरवून केवळ अवैध आर्थिक फायदयासाठी आपले टोळीचे गुन्हेगारी स्वरुपाचे वर्चस्व वाढवित आहेत .
पवार नमुद टोळी प्रमुख पाहिजे आरोपी ( १ ) नकुल शाम खाडे , टोळी सदस्य व आरोपी ( २ ) चेतन चंद्रकांत रा.फ्लॅट नं .३५ मेगासिटी , एस.एन.डी.टी.जवळ पुणे ( ३ ) अभिजित ऊर्फ चोख्या तुकाराम येळवंडे , रा.जाधवचाळ कर्वेनगर पुणे ( ४ ) उमेश श्रीराम चिकणे , रा.शांतीनगर कोथरुड , पुणे यांचेविरुध्द गुन्हेगारी टोळीमार्फत टोळीतील अन्य सदस्यांसह , संयुक्तीक , वैयक्तीक गुन्हे दाखल आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

गुन्हयाचे तपासा दरम्यान पाहिजे आरोपी नामे नकुल शाम खाडे याने आपले अधिपत्याखाली इतर आरोपी यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करून अपराध केलेले असुन यातील आरोपी यांनी खुन , खुनाचा प्रयत्न , खंडणी , दंगा , घातक शस्त्राव्दारे दुखापत , गुन्हयासाठी बेकायदेशीर घातक शस्त्रे व अग्नीशस्त्र बाळगुन नागरीकांच्या मालमत्तेचे , वाहनांची तोडफोड करुन नुकसान करणे व नागरीकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे पोलीसांचे आदेशाचा भंग करणे , यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहे . पाहिजे आरोपी नामे नकुल शाम खाडे याने आपले अधिपत्याखाली इतर आरोपी यांना सोबत घेवून गुन्हा केलेला असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ ( १ ) ( II ) , ३ ( २ ) , ३ ( ४ ) या कलमाचा समावेश करणेबाबतचा प्रस्ताव श्री.शंकर खटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वारजे पो स्टे यांनी

श्रीमती.पोर्णिमा गायकवाड , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -३ यांचेमार्फतीने डॉ.संजय शिंदे , मा अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे यांना पाठविला होता . त्यांनी प्रस्तावाची पडताळणी करून सदर गुन्हयास वरील कलमांचा समावेश करण्यास मंजुरी दिलेली आहे . त्याप्रमाणे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं .१९१ / २०२१ या गुन्हया मध्ये मोक्का कायद्याची कलमे समाविष्ठ करण्यात आलेली असून , सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री.गजानन टोपे , मा.सहा.पोलीस आयुक्त , कोथरूड विभाग , पुणे शहर हे करीत आहेत .

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता पुणे शहर , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे , डॉ.संजय शिंदे , मा.पोलीस उप आयुक्त , परि -३ , पुणे , श्रीमती.पोर्णिमा गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

मा.सहा.पोलीस आयुक्त , कोथरूड विभाग , श्री.गजानन टोपे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री.शंकर खटके वारजे पो.स्टे पुणे , पोलीस निरीक्षक गुन्हे , अमृत मराठे , पोलीस उप निरीक्षक , अशोक येवले , पोलीस अंमलदार भिमराव पुरी , रविकुमार कांबळे , कपाटे , संग्राम केंद्रे , पुडलींक झुंबड , अरूण मोहिते , नितीन कार्तुडे , विशाल बागुल यांचे पथकाने केली आहे .

मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री.अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरिराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बाईकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधकिारी व अंमलदार यांना देण्याचे निर्देश देण्यात आहेत . त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत झालेली ही ३८ वी कारवाई आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *