हातात कोयता घेवुन वाढदिवसा साजरा करणारा अल्पवयीन कोयत्यासह युनिट वन यांचेकडुन जेरबंद .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

१५/०२/२०२२ दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचा केक धारधार कोयत्याने कापुण हातात कोयता घेवुन नाचण्याचा व्हिडीओ काढुन सोशल मिडीयावर व्हायरल करणारा अल्पवयीन कोयत्यासह युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडुन जेरबंद .

युनिट -१ गुन्हे शाखे चे पोलीस अंमलदार अमोल पवार ची कामगिरी.

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दिनांक – १४/०२/२०२२ रोजी युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे युनिट -१ च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , दिनांक १४ फेब्रुवारी रोजी लोहियानगर भागात पी.एम . सी कॉलनी नं ९ येथे वाढदिवसाचा केक कापण्यासाठी कोयता वापरला होता व हातात कोयता घेवुन डीजे लावुन नाचण्याचा व्हिडीओ काढुन तो सोशल मिडीयावर टाकल्याची बातमी मिळाल्याने बातमीचा आशय वरिष्ठांना कळवुन त्यांचे परवानगीने युनिट १ ,गुन्हे शाखा , पुणे शहर पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी स्टाफसह लोहियानगर भागात पंचासह जावुन छापा घालुन सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचे कडुन १ कोयता ५०० / -रुकिमतीचा माल पंचा समक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३३/२०२२ आर्म अॅक्ट क ४ ( २५ ) व महा.पो.अधि . क ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आला असुन सदर विधीसंघर्षीत बालकास पुढील कारवाई कामी खडक पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे

सध्याच्या काळात गुन्हेगार आणि तरुणांनामध्ये मध्यरात्रीचे वेळी चौकामध्ये गर्दी करुन वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार चालु झाले आहेत आणि त्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक तलवार , कोयता सारख्या मोठमोठया बेकायदेशिर हत्याराने कापले जातात व त्याचे व्हिडीओ काढुन सोशल मिडीयावर अपलोड केले जातात अशा प्रकारांना आळा बसविण्याकरिता गुन्हे शाखा पुणे शहर येथील पोलीस बारकाईने लक्ष ठेवुन त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे संकेत पोलीसांनी दिलेले आहेत .

सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री . अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त श्री . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -१ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे , पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड पोलीस अंमलदार अमोल पवार , इम्रान शेख , महेश बामगुडे , तुषार माळवदकर , अय्याज दड्डीकर यांनी केली आहे .

( शैलेश संखे ) वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *