थेरगावमध्ये गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना अटक ; ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त.

ACS POLICE CRIME SQUAD

ACS POLICE CRIME SQUAD

Wajid s khan

थेरगावमध्ये गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना अटक ; ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त.

पिंपरी : गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे . त्यांच्याकडून ७७ हजार ७८१ रुपयांचा गुटखा व ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे एक चारचाकी वाहन , असा एकूण ५ लाख २७ हजार ७८१ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . वाकड पोलिसांनी थेरगाव येथे शुक्रवारी ( दि .२१ ) ही कारवाई केली . सवईराम कोजारामजी देवाशी ( वय २६ , रा . शिरगाव ) , प्रकाश गोपाराम देवाशी ( वय २४ , रा . रावेत ) , अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . पोलीस नाईक मधुकर मल्लिनाथ कोळी यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी हे चारचाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले . तसेच त्यांच्याकडून गुटखा व एक चारचाकी वाहन जप्त केले . वाकड पोलीस तपास करीत आहेत .

सदरची कारवाई पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे , परि २ , सहा . पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले , यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर , पोलीस निरीक्षक ( गुन्हे- १ ) संतोष पाटील , पोलीस निरीक्षक ( गुन्हे २ ) सुनिल टोणपे , सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव , अंमलदार संतोष पाटील , पोलीस नाईक कोळी , गायकवाड , पोलिस शिपाई दुधाळ , पोलीस नाईक चौधरी , पोलिस हवालदार ढोरजे , पोलिस नाईक गंभीरे , कुदळ , पोलिस शिपाई गिलबीले , लोखंडे , पाटील यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ( WAJID S KHAN )

9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *