हडपसर तपास पथकाकडून घरफोडी सह दुचाकी चोरीचे गुन्हे उघड सर्व मालमत्ता हस्तगत,हडपसर पोलीस स्टेशनची कामगिरी,apcs in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे : हडपसर तपास पथकाकडून मौजमजेकरीता घरफोडी करणाऱ्यांना तिघा विधीसंघर्षीतांना ताब्यात घेऊन घरफोडीचे गुन्हे उघड केले आहे. हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान
हडपसर पोलिस ठाणे हद्दीत घडणाऱ्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग घेवून घरफोडी गुन्हे उघड करण्यासाठी आराखडा तयार केला. घरफोडी चोरी करुन नेल्याने अज्ञात इसमाविरूद्ध हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १७७/२०२४ भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

फिर्यादी ओंकार विलास जगताप, रा कॉर्नर लिफ सोसा. फलॅट नं १०२, फुरसुंगी भेकराई रोड, खुटवड चौक, पुणे, यांचे घर दि. २३/०१/२०२४ रोजी ०१:०० वा. ते ०६:३० वा. दरम्यान अज्ञात इसमाने कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागीने, डायमंड रिंग, रोख रक्कम व इतर साहीत्य असे एकुण ३,४०,७००/- किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करुन नेल्याने अज्ञात इसमाविरूद्ध हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १७७/२०२४ भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्यातील घटनास्थळ परिसरात प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सपोनिरी अर्जुन कुदळे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार अनिरूध्द सोनवणे, प्रशांत दुधाळ व निखील पवार असे शोध घेत असताना प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपासपथकास मिळालेल्या गोपनीय माहीती चे आधारे सदर गुन्हा हा आरोपी नामे १) ऋषिकेश संतोष मोटे वय २० वर्ष रा. फुरसुंगी रोडवर खुटवड चौक ऋषिकेश हॉटेल वरती फुरसुंगी २) प्रदीप भागवत पौळ वय २० वर्ष रा. चंदवडी कॅनॉल जवळील बिल्डींगमध्ये फुरसुंगी ३) कृष्णा भिमा पवळ वय १९ वर्ष रा. कामठे आळी चक्रधर ढवळे फुरसुंगी यांनी केला असल्याचे माहीती मिळाली.
त्यावरून नमुद तिनही संशयीतांना ताब्यात घेवून तपास केला असता त्यांचा नमुद गुन्ह्यात सहभाग आढळल्याने त्यांना नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान अधिक तपासात आरोपी ऋषीकेश मोटे याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सर्व ( १०० टक्के) मालमत्ता हस्तगत करण्यात आली असून अधिक तपासादरम्यान आरोपीकडून १) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १८२७/२०२३ भा.दं. वि. कलम ३७९ मधिल चोरीस गेलेली किं. रू ५०,०००/- ची पॅशन प्रो मोटारसायकल २) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १०९/२०२४ भा.दं.वि.कलम ३७९ मधिल चोरीस गेलेली किं. रू १,५०,०००/- बुलेट अशा दोन गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. एकंदरीत तपासादरम्यान आरोपीकडून एकूण किं. रू ५,४०,७००/-चा मुद्देमाल हस्तगत केला असून ३ गुन्ह्यांची उकल झालेली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर, श्री रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. रंजनकुमार शर्मा सो, व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, मा. आर राजा साो, यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, मा. अश्विनी राख मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. रविंद्र शेळके साो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विश्वास डगळे साो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संदीप शिवले साो, यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अनिरूध्द सोनवणे, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
(