Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ४० हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

अलंकार पोलीस स्टेशनचे, पुणे शहर येथील पोलीस उपनिरीक्षक व खाजगी इसम वकील यांचेवर लाच स्विकारले प्रकरणी कारवाई.

अलंकार पोलीस स्टेशन

दि.२३/०१/२०२४,(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

पुणे शहर पोलिस दलातील अलंकार पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या लक्ष्मीनगर पोलिस चौकीत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांच्यावर ४० हजार रूपयाच्या लाच प्रकरणी पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 

थोडक्यात माहिती : यातील तक्रारदार यांच्या भावाच्या विरुद्ध अलंकार पोलीस स्टेशन येथे माहे जानेवारी २०२४ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्याचा तपास अलंकार पो.स्टे. चे पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण हे करीत होते. लोकसेवक गणेश चव्हाण यांनी तक्रारदार यांचेकडे सदर गुन्ह्यात त्यांचे भावाला अटक न करण्यासाठी व गुन्ह्याचे तपासात मदत करणेसाठी ५,००,०००/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.पुणे एसीबीने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली असून काही वेळापुर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांच्यावर ४० हजार रूपयाच्या लाच प्रकरणी पुणे अ‍ॅन्टी करप्शनने कारवाई केली असल्याचे वृत्त समोर आले आहे.

ठिकाण :- मिर्चमसाला हॉटेलच्या समोर फुटपाथवर, कर्वे रोड, पुणे.

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक क्र. १ गणेश चव्हाण यांचेकरीता आरोपी क्र. २ वकील राहुल फुलसुंदर यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती ४०,०००/- रुपये लाच रक्कमेची पंचासमक्ष मागणी करुन, खाजगी इसम आरोपी क्र. २ वकील राहुल फुलसुंदर यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रुपये ४०,०००/- (चाळीस हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. आरोपी लोकसेवक क्र. १ गणेश चव्हाण यांनी आरोपी क्र. २ वकील राहुल फुलसुंदर याना लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले म्हणून त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून,त्यांचेविरुद्ध अलंकार पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.

लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.

१) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *