झोमॅटो व स्वीगी कंपनीची पार्सल डिलेव्हरी करताना कंपनीच्या कामगारांना हडपसर पोलीसांनी अटक करुन त्यांचेकडुन १,९७,००० / – रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

झोमॅटो व स्वीगी कंपनीची पार्सल डिलेव्हरी करताना उच्चभु सोसायटीमधील तसेच रस्त्यावरील येणा – या जाणाऱ्या जेष्ठ महिलांवर पाळत ठेवुन त्यांचे मंगळसुत्र खेचुन जवरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या झोमॅटो व रवीगी कंपनीच्या कामगारांना हडपसर पोलीसांनी अटक करुन त्यांचेकडुन १ ,९७,००० / – रुपयाचा मुद्देमाल केला जप्त
June 23, 2021

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक- १६/०६/२०२१ रोजी दुपारी १३/१० चा चे सुमारास फिर्यादी भारती विठ्ठल भाडळे वय ६० वर्षे धंदा गृहिणी रा , ऊरळी देवाची साने गुरुजी मार्ग ता.हवेली जि.पुणे हे निर्मल टाऊनशिप , काळेपडळ हडपसर पुणे , यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र दोन इसमांनी जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेलेबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४४३/२०२१ भादंविक ३९२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . दाखल गुन्हा हा भरदिवसा हा दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी घडलेला असल्याने तसेच आरोपींनी योगीराज सोसायटीचे आत प्रवेश केला असताना त्याच्या पाठीमागून येवून गळ्यातील चैन जबरदस्तीने ओढून नेली असल्याने , दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून तात्काळ मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक , बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर भागातील सर्व सी.सी.टी.व्ही फुटेज पडताळणी केली असता , अनोळखी ३ आरोपी यांनी फिर्यादी महिलेचा पाठलाग निर्मल टाऊनशिप , काळेपडळ हडपसर पुणे ते योगीराज सोसायटी या दरम्यान त्यांचेवर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करून केला असल्याचे निष्पन्न झाले . आरोपींनी त्यांचे गाडीस झोमॅटो डिलव्हरी बॅग लावलेली दिसली . त्याच्याआधारे नमुद आरोपींचा सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे शोध घेत सुमारे ५०० हून अधिक रोड लगत असलेल्या दुकानाचे व रोडचे बाजुचे कॅमेऱ्यांच्या आधारे शोध घेत असताना गुन्हा केलेले आरोपी हे त्याचेकडील मोटर सायकलवरुन चंदनननगर , खराडी पर्यंत गेले असल्याचे असल्याचे निष्पन्न केले . दिनांक २१/०६/२०२१ रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ व निखील पवार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीचे आधारे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड , प्रदीप सोनवणे , शाहीद शेख , अकबर शेख समीर पांडुळे , शशिकांत नाळे , प्रशांत टोणपे यांनी शेवाळवाडी भागात सापळा रचून आरोपी नामे १ ) आकाश सिध्दलिंग जाधव वय २३ वर्षे धंदा झोमेटो डिलेव्हरी बॉय रा , जहागीरनगर , साज कंपनीसमोर शिंदेवस्ती हडपसर पुणे . मुळगाव लेन नंबर -५ , कावळा गल्ली सेंटलमेंन्ट सोलापुर २ ) विजय जगन्नाथ पोसा वय २२ वर्षे धंदा स्वीगी डिलेव्हरी बॉय रा . लेन नंबर- ४ , तुळजाभवानीनगर खराडी पुणे . ३ ) साहिल अनिल गायकवाड वय २२ वर्षे धंदा जिम हाऊसकिपर ( अॅक्टीवेट जीम सोलापुर ) रा . मु.पो. सावरखेड , जय हनुमान तरुण मंडळाजवळ , ता.सोलापुर जि.सोलापुर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता , आरोपी आकाश जाधव याने सांगितले की , दिनांक- १६/०६/२०२१ रोजी दुपारी मी व माझे दोन साथीदार असे तिघेजण एच.एफ.डिलक्स मोटर सायकलवरुन झोमेटोची डिलेव्हरी देण्यासाठी निर्मल टाऊनशिपमध्ये गेलो होतो . डिलेव्हरी देवुन बाहेर आलो तेंव्हा सदर सोसायटी मधून एक महिला बाहेर आली . त्यांच्या पाठोपाठ जावुन त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने ओढून दुचाकी गाडीवर निघून गेलो असल्याचे सांगीतले . तसेच दाखल गुन्हा केल्यानंतर आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी दिनांक १९ /०६ /२०२१ रोजी अशाच प्रकारे चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुपारच्या वेळेस महिलेच्या गळ्यातील जबरस्तीने मंगळसुत्र चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . तीन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने हे करीत आहेत . सदरची कामगिरी ही मा.श्री नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , श्री . बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , श्री . राजु अडागळे , पोनि . ( गुन्हे ) श्री . दिगबर शिंदे पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने . पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , पोलीस शिपाई शाहीद शेख , अकबर शेख , शशिकांत नाळे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *