गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड ची उल्लेखनीय कामगीरी

२४/०६/२०२१
गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड ची उल्लेखनीय कामगीरी


 पिंपरी चिंचवड बंद घराच्या खिडकीचे गज कापुन घरात प्रवेश करुन वृध्द दांपत्याचे हातपाय बांधुन धाडशी दरोडा टाकणारी व सराईतपणे घरफोडी चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश, पाच अट्टल दरोडेखोर आरोपी अटक करुन ०६ गुन्हे उघडकीस , आतापर्यंत ४७,५०,०००/- रूपये किंमतीचे ९५ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने जप्त.


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणाऱ्या घरफोडी चोरीस प्रतिबंधव्हावा व झालेल्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत पोलीस आयुक्त मा.श्री कृष्णप्रकाश साो.यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे 
गुन्हे शाखा युनिट.५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी २०२१ मध्ये सहा.निरीक्षक श्री राम गोमारे, गुन्हे शाखा युनिट ५ कडील पोलीस स्टाफ असे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील उघडकीस न आलेल्या गुन्ह्याबाबत माहिती घेत असताना सहा.निरीक्षक श्री राम गोमारे यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रात्रीच्या वेळी घराच्या खिडक्यांचे गज कापून आत प्रवेश करून घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीपैकी एक आरोपी लिंग्या उर्फ अजित व्यकंप्पा पवार हा औरंगाबाद येथे नातेवाईकाकडे आश्रयास आहे. त्याप्रमाणे वरिष्ठांच्या परवानगीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास इंगवले यांचे मार्गदर्शना खाली सहा.निरीक्षक श्री राम गोमारे व युनिट कडील स्टाप यांचे पथक तयार करून आरोपी शोध घेण्यासाठी पाठवले वरील टीमने तीन दिवस वेशांतर करून वाळुंज येथुन आरोपी लिंग्या उर्फ अजित व्यकंप्पा पवार यास औरंगाबाद येथुन ताब्यात घेवुन गुन्हे शाखा युनिट ५ येथे आणुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडुन एकुण ३३ तोळे वजनाचे दागीने जप्त करण्यात आले तसेच सदर आरोपीस तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. ११/२०२१ भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०, मधील गुन्ह्यात वर्ग करून पो.उप.नि. राहुल कोळी व पोलीस स्टाफ यांनी तपास करून दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याच्या दागीन्या पैकी १५ तोळे वजनाचे दागीने जप्त करण्यात आले आहे.


यातील उर्वरीत पाहिजे असणारे आरोपी हे अक्कलकोट, सोलापूर,उस्मानाबाद, करमाळा येथील जंगल भागात लपुन छपुन वास्तव्य करत आहेत अशी माहिती वपोनि श्री रामदास इंगवले यांना मिळाली माहीती प्रमाणे चार टिम तयार करून रवाना करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे वरिष्ठांच्या परवानगीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास इंगवले , पोलिस उप-निरीक्षक राहुल कोळी व युनिट ५ कडील स्टाफ असे अक्कलकोट सोलापुर येथे जावुन पाहीजे आरोपीचा शोध घेवुन वरील टीमने अक्कलकोट परिसरात वेषांतर करून सतत चार दिवस वॉच ठेवून जंगलात लपुन छपुन वास्तव्य करणा-या सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे १) आप्पा राम भोसले, वय ४० वर्ष, राहणार- सिंदगाव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद त्याची साथीदार पत्नी २) सारिका संतोष चौगुले उर्फ पायल आप्पा भोसले ३) अक्षय मंगेश शिंदे वय. २२ वर्ष रा. काजी तडमस ता. अक्कलकोट जि. सोलापुर यांना स्थानिक पोलिस स्टॉफचे मदतीने ताब्यात घेऊन गुन्हे शाखा, युनिट ५ येथे आणून त्याच्याकडे सखोल चौकशी करून अत्यंत कुशल पध्दतीने तपास करून विचारपूस केली तसेच आरोपी ४) अजय रिका उर्फ राहुल पवार रा. केम ता. करमाळा जि. सोलापुर यास सदर गुन्हृयात निष्पन्न करून अटक केली व त्यांच्या कडुन ४७ तोळे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले आहे.

१) तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ११/२०२१ भा.द.वि.क. ४५४, ४५७, ३८०, ४११, ३४
२) तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. १३५/२०२१ भा.द.वि.क. ४५७, ३८०, ४११, ३४
३) तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १३७/२०२० भा.द.वि. क. ४५७,३८०,३४
४) देहूरोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ७९६/२०२० भादवि कलम ४५७, ३८०
५) देहूरोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ६३५/२०२० भादवि कलम ४५७,३८०
६) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. ७५/२०२१ भा.द.वि.क. ३९५ ,४५२, ३४ आर्म ॲक्ट ४ (२५)
यातील आरोपी कडुन वरील गुन्ह्यातील चोरीला गेलेले एकुण ४७,५०,०००/- रूपये किंमतीचे ९५ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहे.
तसेच सदर आरोपी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये खालील गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी आहेत.
हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५९६/२०२० भा.द.वि.क. ३८०
देहूरोड पोलीस स्टेशन गु.र.नं. १३२/२०२० भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०
भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६०१/२०२० भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०
चाकण पोलीस स्टेशन गु.र.नं. ९०३/२०२० भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०
आळंदी पोलीस स्टेशन गु.र.नं. २६७/२०२० भा.द.वि.क. ४५७, ३८०
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीसचे पोलीस आयुक्त मा. श्री कृष्णप्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त मा. श्री रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त गुन्हे मा. श्री सुधीर हिरेमठ , पोलीस उपायुक्त परिमंडळ २, श्री. आनंद भोईटे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -१, श्री. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास इंगवले , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदिप लोंढे तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे , पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस अंमलदार धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसोडे , सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले,नितीन बहिरट, भरत माने ,संदीप ठाकरे, गणेश मालुसरे, दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रंह्मादे, राजेंद्र शेटे,नागेश माळी, विकास आवटी व पोपट हुलगे सर्व नेमणुक गुन्हे शाखा युनिट ५ यांनी केली आहे.

                                                            

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *