घरफोडी करणारे २ सराईत पोलिसांकडू हडपसर पोलीसांनी केली उत्तम कामगिरी .

विधिसंघर्षित बालकाकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागीन्यापैकी १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने किं . रू १० लाख २५ हजार चे १० तासाच्या आत जप्त करून गुन्हा उघडकीस आणुन हडपसर पोलीसांनी केली उत्तम कामगिरी .

ACS POLICE CRIME SQUAD

फिर्यादी रोहित रामकिसन केंडे वय ३४ वर्षे धंदा नोकरी रा . लेन नं . १४ , मल्हार बिल्डींग दुसरा मजला फुरसुंगी पुणे हे

सुमारास कोल्हापुर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जाताना घरास कुलुप लावून दारे खिडकी बंद करून गेले होते . त्यानंतर नातेवाईकांना भेटुन ते दि . ११/१०/२०२१ रोजी रात्रौ ००/३० वाजताचे सुमारास फुरसुंगी येथे राहते घरी परत आले असता कोणी तरी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलुप कशाचे तरी साहाय्याने तोडुन आत प्रवेश करुन सोन्याचे दागीने घरफोडी चोरी करुन नेली असल्याने अज्ञात .मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो , हडपसर पोलीस स्टेशन पुणे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकातील अधिकारी हनुमंत गायकवाड , सहा . पोलीस निरीक्षक , सौरभ माने , पो.उप निरीक्षक पोलीस अंमलदार अविनाश गोसावी समीर पांडुळे , शशिकांत नाळे , शाहिद शेख , निखील पवार , प्रशांत दुधाळ असे घटनास्थळी जावून • निष्पन्न करून त्याआधारे संशयीत आरोपीत इसमांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शशिकांत नाळे आणि अविनाश गोसावी , यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , मल्हार बिल्डींग , फुरसुंगी येथे घरफोडी चोरी करणारे दोन मुले ही अपेक्षा लॉन्स , फुरसुंगी ब्रिजजवळ , हडपसर पुणे येथे निळया रंगाच्या मायस्ट्रो मोपेड गाडीवरुन येणार आहेत . त्याचेकडे चोरीचे दागिने आहेत . अशी बातमी मिळाल्याने सदर बातमीचा आशय मा वरिष्ठांना कळवून त्यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अपेक्षा लॉन्स , फुरसुंगी येथे तपासपथकातील वरिल अधिकारी व अंमलदार यांनी दोन टिम मध्ये सापळा रचून वेगवेगळ्या ठिकाणी थांबून सी.सी.टी.व्ही फुटेज मधिल प्राप्त संशयीत इसमांचे वर्णनामधील व बातमीदाराने दिलेल्या बातमीतील दोन इसम हे निळ्या रंगाच्या मायस्ट्रो मोपेड गाडीवरुन येत असताना दिसले तेंव्हा त्यांना स्टाफचे मदतीने पाठलाग करुन पकडले . त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारले असता ते वयाने लहान असल्याचे निष्पन्न झाल्याने व ते विधीसंघर्षग्रस्त बालकांची पंचाना बोलावुन अंगझडती घेतली असता त्यांचेकडे सोन्याचे दागीने मिळूल आले . सोन्याचे दागिन्याबाबत त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की , आम्ही दोघांनी मिळुन मल्हार बिल्डींग येथील दुस – या मजल्यावरिल घराचे दिवसा कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश करुन सोन्याचे दागिने चोरुन ते आपसात वाटुन घेतले असल्याचे सांगितले नमुद विधिसंघर्षित बालक यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेले दागीन्यापैकी १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने किं.रु १० लाख २५ हजार चे २४ तासाच्या आत जप्त करून दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे . नमुद विधिसंघर्षित बालक यांच्याकडून गुन्ह्याकरीता वापरलेली मोपेड , अॅपल फोन जप्त करण्यात आलेला आहे . दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सौरभ माने , पोलीस उप निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत .

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

ACS POLICE CRIME SQUAD

पोलिसांकडून तपास सुरु असताना तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज , आरोपींची देहबोली आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपास सुरु केला . दरम्यान , फुरसुंगीतील घरफोडी करणारे दोन मुले अपेक्षा लॉन्स येथे मायस्ट्रो मोपेडवरुन येणार असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले . त्यांची अंगझडी घतेली असता घरफोडीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने त्यांच्याकडे मिळून आले . घराचे कुलूप तोडून चोरी करुन चोरीचा मुद्देमाल वाटून घेतल्याचे त्यांनी सांगितले . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत .

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण , पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते , हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम , पोलीस निरीक्षक राजू अडागळे , दिगंबर माने यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने , पोलीस अंमलदार अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , शशिकांत नाळे , सचिन जाधव , शाहीद शेख , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे , रियाज शेख , सचिन गोरखे यांच्या पथकाने ही कामगिरी केली .

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *