महिला मंडल अधिका – याला २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक ने केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

(दि.६/१२/२०२२) सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी वीस हजार रुपये लाच घेताना मौजे शिवणे येथील महिला मंडल अधिकारी आणि एजंटला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसबीच्या पथकाने ही कारवाई मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक तलाठी कार्यालयात मंगळवारी केली.

तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले . आरोपींवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर (वय ५४) आणि एजेंट संभाजी लोहोर असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत ४८ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे शुक्रवारी (दि.२) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांनी मावळ तालुक्यातील भडवली येथे जमीन खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्यासाठी संगीता शेरकर यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

पुणे एसीबी पथकाने पडताळणी केली असता, संगीता शेरकर यांनी सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्यासाठी वीस
हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी आढले बुद्रुक तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले.
आरोपींवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.ही कारवाई पुणे लाचलुच पत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शना खाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली .

Web Title :- Pune ACB Trap | Anti-corruption arrest agent with Lady officer in bribery of 20,000

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *