पोलीसांवर हल्ला करुन फरार झालेल्या अट्टल दरोडेखोरास हडपसर पोलीसांनी केले अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

०७/०७/२०२१ कोथरूडमध्ये पोलीसांवर हल्ला करुन फरार झालेल्या अट्टल दरोडेखोरास हडपसर पोलीसांनी केले जेरबंद

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनेत वाढ झाल्याने मा वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शानुसार वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता दिलेल्या सुचनाप्रमाणे दिनांक- ०६/०७/२०२१ रोजी १८/०० वाजताचे सुमारास हडपसर पोलीस स्टेशन तपासपथकाचे प्रभारी अधिकारी हनुमंत गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार ५८३१ सोनवणे , पोलीस हवालदार २८०० गायकवाड , पो.ना. ३२४ गोसावी , पो . ना . ७५६६ पांडूळे , पोलीस शिपाई ४७९ शाहिद शेख , पोलीस शिपाई ७६८४ नाळे , पो.शि .८३५६ पवार , व पो.शि .८३९२ दुधाळ असे मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो , हडपसर स्टेशन , पुणे

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

यांचे दोन पथके तयार करुन हडपसर पोलीस स्टेशनच्या हददीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक समीर पांडुळे व पोलीस शिपाई शाहिद शेख यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की . हिंगणेमळा रोडने बिराजदारनगर हडपसर पुणे . येथे आमचे ओळखीचा व रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सोमनाथ नामदेव धारुळे वय २४ वर्षे रा.गल्ली नंबर -३ बिराजदार नगर हडपसर पुणे हा त्याचेकडे चोरीची हिरो होन्डा कंपनीची सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकलवरुन फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने आम्ही वर नमुद स्टाफसह सदर ठिकाणी जावुन पाहिले असता सदरचा इसम हा त्याचेकडील होन्डा सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकलवरुन फिरत असताना दिसला त्याला आम्ही थांबण्याचा इशारा केला असता तो न थांबता पळुन जात असताना त्यास वरिल स्टाफचे मदतीने पकडुन त्याला त्याचेकडे असलेल्या गाडीचे कागदपत्राविषयी विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवुन गाडीचे कागदपत्र दिली नाही .

ONLINE PORTAL NEWS

त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोटर सायकल हि ब्रीजखालुन गाडीतळ हडपसर पुणे . येथुन काहि दिवसांपुर्वी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन पोलीस स्टेशनचे अभिलेख चेक केले असता सदरबाबत हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर- ५००/२०२१ भा.द.वि.कलम- ३७९ प्रमाणे मोटर सायकल चोरीचा गुन्हा दाखल असलेबाबत समजले . त्यास सदर गुन्हयात अटक करुन त्याचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्याने सागितले की , “ मी व माझे साथीदार नामे बल्लुसिंग प्रभुसिंग टाक , उजालासिंग प्रभुसिंग टाक , पिल्लुसिंग कालुसिंग जुन्नी , जलसिंग दुधाणी , गोरखसिंग टाक असे आम्ही सर्वजण दोन दिवसांपुर्वी पंचरत्न सोसायटी , काथरुड पुणे येथे हत्यारानीशी दरोडा टाकण्यासाठी गेलो होतो सदर ठिकाणी एका प्लॅटचे कुलुप तोडुन आम्ही पळुन जात असताना त्याठिकाणावरील पोलीस आमचा पाठलाग करीत असताना आम्ही त्यांचेवर हत्यार उगारुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . त्याठिकाणी माझ्या साथीदाराना पकडण्यात आले व मी त्याठिकाणाहुन निसटुन पळुन गेलो असे सांगितल्याने कोथरुड पोलीस स्टेशनला संपर्क करुन सदर प्रकाराबाबत विचारपुस केली असता सदरबाबत कोथरुड पोलीस स्टेशन गुन्हा

रजि.नंबर- १३८/२०२१ भा.द.वि.कलम- ३०७,३९५,३९७,३५३ भारतीय हत्यार कायदा कलम- ४ ( २५ ) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले . सदरचा आरोपी हा कुख्यात दरोडेखोर व पोलीसांवर हल्ला करुन पळुन गेलेला आहे .

सदरची कामगिरी ही मा.श्री नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

हडपसर विभाग पुणे , श्री . बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , श्री . राजु अडागळे , पोनि ( गुन्हे ) श्री . दिगबर शिंदे पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने ,पोलीस शिपाई शाहीद शेख , अकबर शेख ,

पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , शशिकांत नाळे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे . ( बाळकृष्ण कदम ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *