खडक पोलीस स्टेशनची कामगिरी फसवणुक करणा – या गुजरात राज्यातील टोळीला अटक
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
०७/०७/२०२१ खडक पोलीस स्टेशन पुणे शहर खरे सोने असल्याचे भासवुन बनावट सोन्याची माळ विक्री करण्याचे उद्देशाने अॅडव्हान्स म्हणुन ३ लाख रुपये घेवुन आर्थिक फसवणुक करणा – या गुजरात राज्यातील टोळीला अटक करण्यात मोठे यश
ONLINE PORTAL NEWS
सदर बाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी इसम नाम विक्रम प्रकाश रावल वय २७ वर्षे धंदा व्यापार रा .८७ . गुरुवार पेठ , पोरवाल जैन गंदीर , आंदेकर गल्ली पुणे यांनी तक्रार दिल्यात मजकुर की
दिनांक २३/०६/२०२१ रोजी सकाळी ७/३० वा . सुमारास स्वारगेट एच पी पेट्रोपंपाचे जवळ मोदी टॉवर , गिश्रा पेदेवालाचे समोर फुटपाथवर १०२२ , शुक्रवार पेठ , टिळक रोड पुणे येथे आरोपी इसम नामे प्रजापत ऊर्फ देवा राठोड त्याचे सोबत आलेला इसम नितीश सोलंकी व महिला अत्रीबाई सोलंकी उर्फ वाघेला यांनी सर्वांनी मिळुन संगणमत करुन १ किलो वजनाची बनावट सोन्याची मणी असलेली माळ खरी असल्याचे भासवुन ती फिर्यादी यांना चेक करण्यासाठी दिली . त्याबदल्यात अॅडव्हान्स म्हणुन ३ लाख रुपये घेवुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
म्हणुन खडक पोलीस स्टेशन पुणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरील गुन्हाचा तपास करीत असतांना गुन्हयातील पाहिजे आरोपी हे बी एस.एन.एल ऑफिस काशेवाडी चे पाठीमागे पुणे येथे थांबले असल्याचे माहिती तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री राहुल खंडाळे यांना मिळाल्याने त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव १ ) प्रजापत ऊर्फ देवा प्रेमा राठोड वय ३२ वर्षे रा.गोसावी वस्ती , पुणे सोलापुर रोड , वैदुवाडी हडपसर पुणे मुळ रा.वडोद्रा राज्य गुजरात २ ) नितीश उत्तम सोलंकी वय ३१ वर्षे रा.सदर असे सांगुन त्यांचेकडे वरील गुन्हयाचे संदर्भात तपास करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली , त्याचेकडे अधिक तपास करता त्यांचे घरझडती मध्ये जवळ जवळ १.१ किलो वजनाचे २ बनावट सोन्याची मणी असलेली माळ जप्त करण्यात आली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना यामध्ये असे निष्पन्न होत आहे की , आरोपींनी पुणे , ठाणे , मुंबई , गुजरात मध्ये छोटे छोटे सोन्याचे दुकानदारांना टार्गेट करुन आम्हांला कन्ट्रक्शन साईडवर काम करीत असतांना सोन्याची माळ सापडली असल्याचे सांगुन त्यांना लालच देवुन त्यांची आर्थिक फसवणुक करीत असले बाबत आढळुन आले आहे .
नमुद सर्व कारवाई ही श्री.अभिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर , डॉ.संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , श्री सागर पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ ( अतिरीक्त कार्यभार परिमंडळ १ ) व श्री . सतिश गोवेकर , सहा पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री . श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) . तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप – निरीक्षक राहुल खंडाळे . पोलीस उप निरीक्षक श्री.विक्रम मिसाळ व पो.हवा फहिम सैय्यद , संदिप पाटील , अनिकेत बाबर , रवी लोखडे , पोलीस अंमलदार समीर माळवदकर , बंटी कांबळे , राहुल मोरे , हिम्मत होळकर , कल्याण बोराडे यांचे पथकाने केली आहे ,
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526