लोणीकाळभोर पोलीसांकडुन मोटार सायकल चोरांना अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

प्रेसनोट ता .०६ / ०७ / २०२१ ( लोणीकाळभोर पोलीसांकडुन मोटार सायकल चोरांना अटक करून किं.रू .२,२०,००० ( दोन लाख वीस हजार ) रूपये किंमतीच्या एकुण ०७ मोटार सायकली जप्त )

ONLINE PORTAL NEWS 9822331526

पुणे शहरातील होणा – या वाहनचोरीस आळा घालणे व वाहनचोरी करणारे सराईत गुन्हेगार यांना पकडण्याबाबत मा.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त व मा.डॉ.रविंद्र शिसवे , सह आयुक्त पुणे शहर यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत . दि .०३ / ०७ / २०२१ रोजी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथील तपास पथक हददीत गस्त घालत असतान बातमीदार यांचे मार्फतीने तपास पथकातील पोकों / शैलेश कुदळे व पोका / बाजीराव विर यांना माहीती मिळाली की इसम नामे महादेव पोपट पांगारकर हा चोरीची अॅक्टीव्हा मोटार सायकल घेवुन लोणीकाळभोर गावचे हददीत फिरत आहे . बातमीप्रमाणे तपास पथकातील पथक प्रमुख सपोनि / राजु महानोर यांनी वपोनि / राजेंद्र मोकाशी यांना कळवुन त्यांचे आदेशाप्रमाणे मिळाले बातमीनुसार इसम नामे महादेव पोपट पांगारकर वय २६ वर्षे रा.पांगारकरवस्ती , सहजपुर ता . दौंड जि.पुणे यांस शिताफीने पाठलाग करून ताबेत घेतले असता त्याने त्याचेकडील मोटार सायकल ही उरूळीदेवाची येथुन चोरी केल्याचे सांगीतल्याने त्यास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .२३६ / २१ भा.द.वि.क .३७९ मध्ये अटक करून त्याचेकडे सखोल तपास केला असता महादेव पोपट पांगारकर याने त्याचा मित्र राहुल सुरेश भिलारे रा . जावजीबुवाची वाडी ता.दौंड जि.पुणे याचे मदतीने पिंपरी चिंचवड , चिखली , वाकड , भिगवन , खेड , लोणीकाळभोर परीसरातुन मोटार सायकली चोरल्याचे सांगितलेने महादेव पांगारकर याचा साथीदार नामे राहुल सुरेश भिलारे यांस सापळा रचुन ताबेत घेवुन दोन्ही आरोपी यांचेकडे तपास करून त्यांचेकडुन किं.रू .२,२०,००० / -च्या एकुण ०७ मोटार सायकल जप्त केल्या असुन आरोपीत यांचेकडुन पुणे शहर , पिंपरी चिंचवड तसेच पुणे ग्रामीण जिल्हयातील खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

१ ) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .२३६ / २१ भा.द.वि.क .३७९

२ ) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .३०८ / २१ भा.द.वि.क .३७९

३ ) खेड स्टेशन गुन्हा रजि.नं .२९५ / २१ भा.द.वि.क .३७९

४ ) भिगवन पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .१६२ / २१ भा.द.वि.क .३७९

५ ) चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .२५ / २१ भा.द.वि.क .३७९

६ ) वाकड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .५३८ /२१ भा.द.वि.क .३७९

७ ) चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .२८३ /२१ भा.द.वि.क .३७९

ONLINE PORTAL NEWS

तसेच महादेव पांगारकर व राहुल भिलारे सध्या यवत पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजि.नं .५५४ / २१ भा.द.वि.क ३५४ मध्ये पाहीजे आरोपी असलेबाबत माहीती मिळाली आहे तरी . वरील आरोपीत सध्या कोर्टाचे आदेशान्वये पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन तपास चालु आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.श्री.नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ , मा.श्री कल्याणराव विधाते स.पो.आ. हडपसर विभाग , राजेन्द्र मोकाशी वपोनि , सुभाष काळे पोनि ( गुन्हे ) , लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी राजु महानोर सपोनि , यांचे सोबत पो.हवा / नितीन गायकवाड , पो.ना / अमित साळुके , श्रीनाथ जाधव , सुनिल नागलोत , पोकॉ / अक्षय कटके , प्रशांत सुतार , शैलेश कुदळे , बाजीराव वीर , निखील पवार , दिगंबर साळुके यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *