दरोड्याच्या तयारीत असलेल्या ४ आरोपींना मुंढवा पोलिसांनी केली अटक.apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
मा. पोलीस आयुक्त, अमितेशकुमार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे बरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी यांच्याकडून हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाय योजना केल्या जात आहेत.
दिनांक ०७/०३/२०२४ रोजी मुंढवा पोलीस ठाणे हद्दीतील शिंदेवस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे येथे फिर्यादी हे पायी चालत जात असतांना अॅटो रिक्षामधुन जाणाऱ्या चार इसमांनी फिर्यादी यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेत असतांना फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता चाकूने हातावर वार करुन जखमी करुन मोबाईल घेवून पळुन गेले असल्याने फिर्यादी यांचे तक्रारी प्रमाणे मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर कलम १०१/२०२४ भा.दं.वि. कलम ३९४, ३२४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी १) सारंग ऊर्फ साऱ्या हनुमंत गायकवाड, वय १९ वर्षे, रा. सर्व्हे नं. ९४, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे २) ऋषीकेश ऊर्फ भोन्या गोवर्धन कांबळे वय २३ वर्षे ३) अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड, म्हसोबा मंदीराजवळ, सर्वोदय कॉलनी, पुणे. ४) हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड, वय २१ वर्षे, रा. सर्वे नंबर ५, मुंगसे आळी, केशवनगर पुणे. यांना अटक करण्यात आली आहे.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करुन सदर घटनेची माहिती घेतली. सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेणे करीता तपास पथक, चौकी पथक अधिकारी अंमलदार यांना रवाना केले. दाखल गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असतांना दिनांक ०८/०३/२०२४ रोजी पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झालेवरुन खात्री करुन ,१) सारंग ऊर्फ साऱ्या हनुमंत गायकवाड, वय १९ वर्षे, रा. सर्व्हे नं. ९४, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे २) ऋषीकेश ऊर्फ भोऱ्या गोवर्धन कांबळे वय २३ वर्षे, रा. सदर असे ०२ आरोपीतांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आले आहे.

तसेच पाहीजे आरोपीचा शोध घेत असता सर्व्हेलन्स विभागाचे पोलीस अंमलदार हेमंत झुरंगे यांना दिनांक ०९/०३/२०२४ रोजी त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की पाहीजे आरोपी १) अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड, म्हसोबा मंदीराजवळ, सर्वोदय कॉलनी, पुणे २) हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड, वय २१ वर्षे, रा. सर्वे नंबर ५, मुंगसेआळी, केशवनगर पुणे हे पोलीस ठाणे हद्दीत आले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना दिली असता त्यांनी बातमीची खातरजमा करून, कायदेशीर ठोस कारवाई करणे बाबत सुचना दिल्या, त्याप्रमाणे नमुद आरोपीतांना अटक कारवाई करण्यात आली आहे. अटक आरोपी यांचेकडे दाखल गुन्हयांचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता, गुन्हयाची कबुली दिली आहे.
आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करतांना वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.
अटक आरोपींचे पुर्व रेकॉर्ड :-
१) सारंग ऊर्फ साऱ्या हनुमंत गायकवाड, वय १९ वर्षे, रा. सर्व्हे नं. ९४, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे याचे विरुद्ध दखलपात्र ०७ गुन्हे, अदखलपात्र ०२ गुन्हे.
२) ऋषीकेश ऊर्फ भोन्या गोवर्धन कांबळे वय २३ वर्षे, रा. सदर याचे विरुद्ध दखलपात्र ०५ गुन्हे,
३) अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड, म्हसोबा मंदीराजवळ, सर्वोदय कॉलनी, पुणे याचे विरुद्ध दखलपात्र ०२ गुन्हे, अदखलपात्र ०१ गुन्हे.
४) हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड, वय २१ वर्षे, रा. सर्वे नंबर ५, मुंगसे आळी, केशवनगर पुणे यांचे विरुद्ध दखलपात्र ०१ गुन्हे.

सदरची कामगिरी, पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासोबर निकम, सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे, सहा. पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार हेमंत झुरंगे, दिनेश भांदुर्ग, संतोष काळे, महेश पाठक, दिपक कदम, राहूल मोरे, स्वप्निल रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील व इतर टिम यांनी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in