बोगस डॉक्टरामार्फत केशरोपन करणा – या टोळीचा पर्दाफास .

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक ०४/१२/२०२१ – युनिट ४ , गुन्हे शाखा पुणे शहर बोगस डॉक्टरामार्फत केशरोपन करणा – या टोळीचा पर्दाफास

ACS POLICE CRIME SQUAD

विमाननगर परिसरात लुकंड क्लायमॅक्स , या इमारतीतील डॉ . हेअर मॅजिका ही आस्थापना कोणताही वैद्यकीय परवाना नसताना अथवा वैद्यकीय आहर्ता नसताना क्लिनिक म्हणुन चालवुन तेथे बोगस डॉक्टरामार्फत नागरिकांचे हेअर ट्रान्सप्लांट सारख्या शस्त्रक्रिया करुन उपचार केले जात असल्याबाबतची माहिती युनिट ४ कडील पोलीस हवालदार नागेशसिंग कुंवर यांना प्राप्त होती . त्याप्रमाणे सदर माहितीची गुप्तपणे पडताळणी केली असता सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे महानगर • पालिकेकडील बोगस डॉक्टर कारवाई समिती तसेच अन्न व औषध प्रशासन यांचे पथकाला माहिती दिली . . त्याप्रमाणे महानगरपालिका कडील वैद्यकिय विभागीय अधिकारी डॉ . श्रीमती रेखा गलांडे यांचे वैद्यकिय पथक व युनिट ४ कडील पथक व अन्न सुरक्षा निरीक्षक , यांनी सदर ठिकाणी छापा टाकून त्याचा परवाना तपासला असता सदर आस्थापनेकडे कोणताही वैद्यकीय परवाना मिळुन आला नाही . सदर आस्थापना चालवणा – या आरोपिंताकडे कोणताही वैद्यकिय परवाना अथवा वैद्यकिय डिग्री नसताना ते पेशंटच्या जिवानिशी खेळुन सदरचे ट्रान्सप्लांट प्रक्रिया करत होते . त्याचे क्लिनिकमध्ये शेडयुल एच टाईप ड्रग्ज , हेअर ट्रान्सप्लांट करिता लागणारी उपकरणे इत्यादी साहित्य मिळुन आले आहे .

१. शहारुख हैदर शहा रा . गणेशनगर , वडगाव शेरी ,

२. पंचशिला काशिनाथ रोडगे रा . रामवाडी , पुणे

३. चैताली भरत म्हस्के रा . वडगाव शेरी , पुणे

या तिनही आरोपीतांकडे कोणतीही वैद्यकिय डिग्री नाही . ते येणा – या ग्राहकांना आम्ही हेअर प्लांटचे तज्ञ डॉक्टर आहोत , असे भासवून त्यांचेवर हेअर प्लांटची शस्त्रक्रिया करून अनेक ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणुक केली असल्याने त्यांचेविरुध्द भा . द . वि . कलम ४२०,४०६ , ३४ तसेच महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसाय अधिनियम कलम ३३ ( २ ) प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन तिनही बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे .

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) श्री . रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे , सहा . पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री . जयंत राजुरकर , सहा . पोलीस निरीक्षक शोभा क्षिरसागर , पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील , पोलीस अंमलदार महेंद्र पवार , राजस शेख , नागेशसिंग कुंवर , संजय आढारी , दत्ता फुलसुंदर , सागर वाघमारे या युनिट ४ चे पथकाने केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *