२० किलो ६१५ ग्रॅम वजनाचा गांजा ०२ दुचाकी सह एकून ७,२४,८७५ / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

ACS POLICE CRIME SQUAD

२० किलो ६१५ ग्रॅम वजनाचा गांजा ०२ दुचाकी सह एकून ७,२४,८७५ / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
वाकड (पिंपरी चिंचवड) वाकड पोलीस स्टेशन ची कारवाई .

ACS POLICE CRIME SQUAD

मा . श्री कृष्ण प्रकाश सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांनी अंमली पदार्थाचे गुन्हयांना आळा घालणेबाबत सुचना दिल्या त्या अनुषंगाने डॉ . विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि श्री . संतोष पाटील , श्री . अभीजीत जाधव व तपास पथक अंमलदार यांना पेट्रोलींग करून सदर गुन्हयांना आळा घालनेबाबत सुचना दिल्या . त्या अनुषंगाने दि . २९ / ११ / २०२१ रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दी मध्ये डॉ . विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव , पोहवा धुमाळ , पोहवा विक्रम कुदळ , पोना विक्रांत चव्हाण , पोना गिलबीले अवैध धंदयांची माहीती काढण्याकरीता छाप्यास लागणारे साहीत्यासह स्टेशन डायरी नोंद करून खाजगी वाहनाने १८.०० वाजता रवाना झाले होते .
ते पेट्रालींग करीत ताथवडे गावातील हॉटेल ब्लु वॉटर जवळ पोहचले असता हॉटेल शेजारी असलेले मोकळे जागेत एक अॅक्टीव्हा मोटार सायकल व एक होंडा डिओ जवळ चार इसम काहीतरी संशयीतरित्या बोलत असताना दिसले .
सदरचे मोटार सायकलांवर दोन पांढरे रंगाचे गोणी ठेवलेले दिसले , ते चौघेही इकडे तिकडे कावरे बावरे नजरेने पाहत होते . तेव्हा त्यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटली , परंतु त्याचवेळी त्या संशयीत इसमांना पोलीस स्टाफचा संशय आल्याने ते घाईघाईने त्यांचेकडील मोटार सायकलवरुन बसुन तेथुन निघुन जाण्याचा प्रयत्न करु लागले . तेव्हा पोलीस स्टाफला त्यांचे ताब्यातील मोटार सायकलवर असलेले गोणी मध्ये नक्कीच काहीतरी संशयास्पद असल्याचा अधिकच संशय आल्याने ते तेथुन निघुन जावु नये म्हणुन पोलीस स्टाफने लागलीच पळत जावुन त्यांना घेराव घालुन त्या इसमांना जागीच पकडले . तेव्हा सदर इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे
१ ) सुनिल सुधाकर भापकर वय २५ वर्षे रा . लक्ष्मी निवास बिल्डींग , गणेश मंदीराजवळ ताथवडे पुणे मुळ रा . काळेवस्ती ता . पाथर्डी जि . अहमदनगर ,
२ ) आकाश महादेव खाडप वय २० वर्षे रा . सुरेखा पवार यांचे घरी भाडयाने , पवारवस्ती , ताथवडे पुणे
३ ) प्रविण ऊर्फ पवन दिलीप गाडे वय २१ वर्षे रा . नाना नवले यांचे घरी भाडयाने , नवलेवस्ती ताथवडे पुणे मुळ रा.माळेगाव ता.पाथर्डी जि . अहमदनगर
४ ) रविराज ऊर्फ कन्नड्या राजेंद्र केदार वय २२ वर्षे रा . अशोकनगर , जेएसपीएम कॉलेज जवळ ताथवडे पुणे असे असल्याचे सांगितले. नमुद ताब्यात घेतलेल्या इसमांकडे असलेल्या दोन गोण्यांची व त्यांची कायदेशीर पध्दतीने झडती घेतली असता सदर गोण्यांमध्ये गांजा हा अमली पदार्थ असल्याचे निदर्शनास आले .
पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे .

इसम नामे
१ ) सुनिल सुधाकर भापकर वय २५ वर्षे .रा . लक्ष्मी निवास बिल्डींग , गणेश मंदीराजवळ ताथवडे पुणे मुळ रा . काळेवस्ती ता.पाथर्डी जि . अहमदनगर ,
२ ) आकाश महादेव खाडप वय २० वर्षे रा . सुरेखा पवार यांचे घरी भाडयाने , पवारवस्ती , ताथवडे पुणे
३ ) प्रविण ऊर्फ पवन दिलीप गाडे वय २१ वर्षे रा.नाना नवले यांचे घरी भाडयाने नवलेवस्ती ताथवडे पुणे मुळ रा.माळेगाव ता.पाथर्डी जि . अहमदनगर
४ ) रविराज ऊर्फ कन्नड्या राजेंद्र केदार वय २२ वर्षे रा . अशोकनगर , जेएसपीएम कॉलेज जवळ ताथवडे पुणे यांचे विरोधात वाकड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं १०२१/२०२१ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ) . २० ( ब ) ( ii ) ( क ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन नमुद चारही आरोपी यांना दि . ३०/११/२०२१ रोजी ०१/३० वा अटक करुन मा . न्यायालयात हजर केले असता त्यांना दि .०५ / १२ / २०२१ रोजी पर्यन्ती पोलीस कस्टडीची रिमांड मिळाली आहे .
सदर आरोपी यांचेकडुन २० किलो ६१५ ग्रॅम वजनाचा गांजा , दोन दुचाकी , चार मोबाईल , रोख रक्कम असा एकुण ७,२४,८७५ / – रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे . नमुद आरोपी यांचेकडे अधिक तपास चालु आहे.


सदरची कारवाई मा . श्री . कृष्णप्रकाश सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . डॉ संजय शिंदे सो , अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मा . श्री . आनंद भोईटे सो , पोलीस उप आयुक्त , परि २ पिंपरी चिंचवड , मा . श्री . श्रीधर जाधव , सहा . पोलीस आयुक्त सो , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , श्री . संतोष पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे , सपोनि श्री संतोष पाटील , सपोनि श्री . अभिजीत जाधव , पोलीस अंमलदार , वंदु गिरे , प्रशांत गिलबिले , प्रमोद कदम , बिभीषन कन्हेरकर , तात्या शिंदे , चव्हाण , कौंतेय खराडे , राजेंद्र काळे बाबाजान इनामदार , बापुसाहेब धुमाळ , विक्रम कुदळ , विजय गंभीरे , दिपक साबळे , अतिश जाधव , कल्पा पाटील व नुतन कोंडे यांनी मिळून केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *