Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

हांडेवाडी वाहतूक विभागाची, कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटवरती कारवाई,बारा हजार रुपयांचा दंड वसूल.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

हांडेवाडी वाहतूक विभागाची, कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेटवरती कारवाई,

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे हांडेवाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकींचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे ध्वनिप्रदूषणासह नागरिकांना मोठा त्रास होत होता. हे लक्षात घेत कर्णकर्कश आवाज काढून स्टाईल मारणाऱ्या दुचाकीस्वारांना हांडेवाडी वाहतूक विभागाने चांगलाच दणका दिला आहे. दुचाकींचा सायलेन्सर काढून आतापर्यंत9 दुचाकीस्वारांकडून १२ हजार रुपयाची दंडात्मक रक्कम कारवाईमार्फत आकारली आहे.

दुचाकींना कर्णकर्कश आवाज यावा यासाठी पुणे शहरांमध्ये अनेक जणांनी दुचाकीच्या मूळ भागांमध्ये बदल करून विविध प्रकारचे सायलेन्सर लावले होते. यामुळे दुचाकींना विशेष आवाज येत असला तरी हा आवाज कर्णकर्कश असल्यामुळे ध्वनिप्रदूषणासह नागरिकांनाही याचा मोठा त्रास जाणवत होता.

हे लक्षात घेत हांडेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक, बालाजी साळुंखे यांनी अशा दुचाकीवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस हवालदार विजय आवटे, संदीप गोवेकर राहुल लेकावळे, संजय शिंदे, पोलीस नाईक गणेश कामठे, यांनी ९, बुलेटस्वरांकडून बारा हजाराचा दंड वसूल केला, ही कारवाई केली, आहे. या पुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे. वाहनचालकांना यातून धडा मिळेल इतरांना त्रास होईल असे कृत्य दुचाकीस्वारांनी करू नये हेच आवाहन राहील.
असे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे यांनी सांगितले,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *