पुणे,जिल्हाधिकारी कार्यालयातील वादळी वाऱ्याने फायली फेकल्या बाहेर, व्हिडिओ व्हायरल,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
पुणे,जिल्हाधिकारी कार्यालयातील वादळी वाऱ्याने फायली फेकल्या बाहेर, व्हिडिओ व्हायरल,
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे वाऱ्यावर…
पुणे शहरात आज दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली.ह्या पावसामुळे व वाऱ्यामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे हवेत उडत होती.
पुण्यात आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाला बसला आहे. पाऊस आणि वारा एकत्र आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या कागदपत्राची फाईली या पावसात कार्यालयातून बाहेर फेकल्या गेल्यात
महत्त्वाच्या फायली बाहेर फेकल्यामुळे, पी,डब्ल्यू,डी चा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे
तब्बल ६६ कोटी ३० लाख रुपये खर्च करून बांधलेल्या, मंत्रालयानंतरची सर्वांत सुसज्ज हरित इमारत असा लौकिक असलेल्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस – पीओपी’अशी इमारत उभी केली आहे,
पुणे शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. मात्र, या जोरदार आणि वादळी पावसामुळे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंग फॅन कोसळला आहे. सिलिंग कोसळल्याने शासकीय गाड्यांचा मोठं नुकसान झालं आहे. अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
https://youtube.com/shorts/MmVvr3g5Jkg?feature=share
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे वादळ, वारा, पाऊस, अतिउष्णता, हवा आदींवर आधारित पर्यावरणपूरक बांधकामाबाबतचा प्रशासनाचा दावा फोल ठरला. तसेच हे आच्छादन कोसळून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या गाडीची काच ही फुटली. आहे, कार्यालयातील कागदपत्रे वाऱ्याने उडाली.सुदैवाने कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने मोठी हानी टळली आहे. आत्ता गेल्या अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या पाऊसाने शहरातील अनेक पेठांमध्ये रस्त्यांवर पाणी च पाणी पाहायला मिळत आहे.,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad