कोंढवा पोलिसांकडून रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन,पोलिस आयुक्त अमितेश कुमार.उपस्थित, ,apcs.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

नागरिकांनी अवैध धंद्येवाल्यांसह गुन्हेगारांची माहिती बिनधास्तपणे जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ११२ क्रमांकावर द्यावी,पोलिस आयुक्त अमितेश कुमार,

पुणे कोंढवा पोलिस स्टेशन तर्फे कौसर बाग ग्राऊंड, कोंढवा पुणे या ठिकाणी मुस्लिम बांधवांचे रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन गुरुवारी (ता. १४) सायंकाळी कोंढवा पोलिस स्टेशन तर्फे करण्यात आलेले होते.

पुणे :ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

नागरिकांनी अवैध धंद्येवाल्यांसह गुन्हेगारांची माहिती बिनधास्तपणे जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ११२ क्रमांकावर द्यावी. पोलिस त्यावर निश्चितपणे कारवाई करतील. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

रमझान ईद निमित्त कोंढवा पोलिस ठाण्याच्या वतीने कौसरबाग मैदानावर आयोजित ‘दावत ए इफ्तार’ कार्यक्रमात पोलिस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. त्यांनी मुस्लिम समाजाला पवित्र रमझान सणाच्या शुभेच्छा दिल्या.

आमदार चेतन तुपे, माजी आमदार महादेव बाबर, योगेश टिळेकर, पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, माजी नगरसेवक गफूर पठाण, साईनाथ बाबर, नंदा लोणकर, हसीना इनामदार, जाहीद शेख, मौलाना इद्रिस कादरी, सूफी अन्वर, आबिद सय्यद, राहुल डंबाळे, अली दारूवाला, समीर अन्सार शेख आदी या वेळी उपस्थित होते.

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत. नागरिकांनी अवैध धंद्यांसह गुन्हेगार आणि अमली पदार्थ विक्रेत्यांबाबत पोलिसांना माहिती द्यावी. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांना माहिती देणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही,’ अशी ग्वाही अमितेश कुमार यांनी दिली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखणे कामी करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलिसांना डायल ११२ यावर नियंत्रण कक्ष येते माहिती देऊन पोलिस प्रशासनास मदत करण्याबाबत आव्हान केले. कोणत्याही प्रकारच्या अडी अडचणी करीता पुणे शहर पोलिस प्रशासन हे सदैव नागरिकांच्या सेवेसाठी हजर असेल असे आश्वासन दिले.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *