पुण्यातील खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदयाच्या,मटका-जुगार ?ऽऽऽ.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

खडक पोलीस स्टेशनची पाचही बोटं तुपात, मटका-जुगार अड्ड्यांचा बाजार सुसाट ऽऽऽ.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट आणि सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे धाडस आणि कर्तृत्व- पाकीट आणि थैलीत अंक गणित झाल्यानंतर, अवैध धंदयावर कारवाई होणार नसल्याचा सुटका आणि सुरक्षेचा निःश्वास जुगार अड्डे चालकांनी सोडला आहे.

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील गॅम्बलिंग-
खडक पोलीस स्टेशन हद्दीत सध्या अवैध व बेकायदा धंद्याना उधान आले आहेत. खडक पोलीसांच्या योग्य त्या सहकार्याने जुगार अड्डे, क्लब अवैध दारूचे पाट वाहत आहेत. खडक पोलीस स्टेशन हद्दीतील कासेवाडी, लोहियानगर, गंज पेठेत मटका, जुगार, सोरट आणि अवैध दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ढावरे नावाचा इसम हे धंदे कंट्रोल करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच वसिम व गोरख तसेच बबल्या हे इसम कार्यरत असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे खडक पोलीस स्टेशन हद्दीतील मटका-जुगार अड्डे पूर्वीसारखेच भरभरून वाहत आहेत. मामलेदार कचेरीजवळ असलेल्या खडक पोलीस स्टेशन हद्दीच्या ३६० अंश डिग्री मध्ये ऑनलाईन लॉटरी, मटका अड्डे, तीन पत्ती, ५२ पत्यांचा जुगार, कागद व काचेवरील पणती -पाकोळी जुगार कुठे नाहीत असे विचारल्यास…. सगळीकडे आनंदी आनंद गडे… जिकडे – तिकडे मटके अड्डे… इकडे तिकडे जुगार अड्डे एवढच वर्णन करणं पुरेस ठरलं आहे.

पुण्यातील गुरूवार पेठ जुगार अड्ड्यां???
पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच देखील तसंच आहे, संपूर्ण गुरूवार पेठ जुगार अड्डयासाठी आंदण दिलं असल्याचं चित्र दिसून येत आहे. फुलवाला चौकापासून ते अंबामाता- जैन मंदिर व्हाया डॉ. कोटणीस मनपा दवाखान्यापर्यंत सगळा भुभाग जुगार अड्डयांसाठी आंदण म्हणून देऊन टाकला आहे.


जुगाराचे सर्व प्रकार सुरू आहेत. ही बाब नागरीकांना दिसते, सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकाऱ्यांना दिसते… खडक पोलीस स्टेशन मधील न्याय हक्कांपासून वंचित पोलीसांना देखील दिसते, परंतु पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांसह गुन्हे युनिट आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या दृष्टीपथात आढळुन येत नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीपथात येण्यासाठी नागरीक आणि स्थानिक पोलीसांच्या मदतीने हे वृत्त प्रसारित करावे लागत आहे.

मंडई ते खडकमाळ-.

सणावाराला मंडईत आलेच नाहीत असे कधी होत नाही. मंडई देखील भरभरून वाहत असते. त्यामुळे हे वाहते पब्लिक अवैध धंदेवाल्यांनी ओळखुन याच रस्त्यावर असलेले पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. १ यांचेकडील फरासखाना पोलीस स्टेशन, खडक पोलीस स्टेशन आणि पुढे पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. २ यांच्याकडील स्वारगेट पोलीस स्टेशन आहेत.

मंडई ते खडकमाळ- जुगार अड्डयासाठी चार मजली महाल बांधला –
मंडईपासून ते खडकमाळ आळीपर्यंत जुगार अड्डयातील जुना खिलाडी बंधूचं मोठं प्रस्थ आहे. एवढच कशाला… जुगार अड्ड्यासाठी चार मजली महाल बांधलेल्या बंधूच्या समोरच फडगेट पोलीस चौकी आहे. थोडक्यात जुगार अड्डयाच्या सुरक्षेसाठी फडगेट मधील पोलीसांना धारेवर धरले जाते इतकी त्याची ताकद आहे. हे देखील पोलीस आयुक्तालयाला दिसत नाहीये.

राजेवाडी- कासेवाडी.

राजेवाडी- कासेवाडी- दोघ्या बहिणी… बहिणी…. जुगार अडडयाचा संसार मांडू गंजपेठ पोलीस चोकीपाशी –
खडक पोलीस स्टेशनच्या ३६० अंश डिग्री मधील शेवटचा भाग ठरणाऱ्या मोठ्या स्लम विभागात प्रत्येक गल्ली बोळात मटका, जुगार अड्डा, पत्ता क्लब याशिवाय गांजा, मेफेड्रॉन सारखे अंमली पदार्थ सहजपणे रिचविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. देशी विदेशी दारू- तर ड्राय डे ला देखील मिळते. हात भट्टीच्या पहिल्या धारेत न्हावुन निघणाऱ्यांची दैनंदिन संख्याही कमी नाही.
याच ३६० अंश डिग्रीच्या खडक पोलीस स्टेशन हद्दीत धाडसी पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांनी अनेकदा कारवाई करून इथली सगळी अवैध व बेकायदा यंत्रणा मोडून काढली होती. परंतु स्थानिक पोलीसांच्या मदतीने आणि जोडीला गुन्हे शाखेच्या सहाय्याने अवैध धंदयाची साखळी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. थोडक्यात खडक पोलीस स्टेशनची पाचही बोटे तुपात नसून संपूर्ण खडक पोलीस स्टेशनचे अधिकारीच तुपात डुंबले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरूच नये. तुर्तात इतकेच. पुढे गल्लीबोळ निहाय विवरण पुढे पाहूच.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *