पोलिसांची तक्रार कुठे करावी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पोलिसांविरुद्ध तक्रार कुठे, कोणी आणि कशी करावी?

तक्रारींसाठी पोलिस प्राधिकरण.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे – तक्रारीची दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आक्षेपार्ह वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने तपास केला, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य किंवा तीव्र केले आदी विविध प्रकारच्या तक्रारी ‘विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणा’त नागरिकांना करता येणार आहेत. तक्रार केल्यावर स्वतःची बाजू नागरिक स्वतः मांडू शकतात. त्यासाठी वकीलही नियुक्त करण्याची गरज नाही. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे. 

पोलिसांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राधिकरणात नागरिकांना करता येईल. त्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यात तक्रार सिद्ध करण्यासाठी पुरेसे तपशील आवश्‍यक आहेत. प्राधिकरणात निवृत्त न्यायाधीश रमेश जोशी यांची अध्यक्ष म्हणून तर निवृत्त अतिरिक्त पोलिस आयुक्त चंद्रकांत कुंभार आणि शहर पोलिस दलातील मुख्यालय विभागाचे उपायुक्त यांची पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पदसिद्ध सचिव असतील. या प्राधिकरणात पुणे शहर व जिल्हा पोलिस, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील सर्व प्रकारच्या पोलिस आस्थापनांबाबत तक्रार करता येईल. त्यामुळे सीआयडी, एटीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आदींविरुद्धही नागरिकांना येथे दाद मागता येईल.

संबंधित तक्रारीची पडताळणी करून प्राधिकरण निकाल देणार आहे. त्या निकालात राज्य सरकार किंवा संबंधित पोलिस आयुक्त, अधीक्षकांना कारवाईची शिफारस प्राधिकरण करेल.येथे आहे पोलिस तक्रार प्राधिकरण  ‘अनंत हाईट्‌स’ १ ला मजला, जाधवनगर, सर्व्हे क्रमांक २९-२-१, नांदेड सिटीजवळ, नांदेड फाट्याशेजारी सिंहगड रस्ता, पुणे ४११०६८ (दूरध्वनी क्र. २४३८००७४ – वेळ सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच) 

सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांविरोधात तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले होते . त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये या प्राधिकरणाची स्थापना करून महाराष्ट्र राज्य अशा प्रकारच्या प्राधिकरणाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य ठरले . पोलिसांना कायद्याने दिलेल्या अधिकारांच्या गैरवापराबाबत येथे तक्रार करता येते . कुपरेज परिसरातील एमटीएनएल कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर प्राधिकरणाचे कार्यालय आहे .

याशिवाय ०२२२२८२००४५/४६/४७ हे दूरध्वनी क्रमांक आहेत . mahaspca@gmail.com या ई – मेलवर तक्रार करू शकतो . प्राधिकरणाचे अध्यक्ष ए . व्ही . पोद्दार ( निवृत्त न्यायाधीश ) , याशिवाय अतिरिक्त महासंचालक ( निवृत्त ) आर . आर . सोनकुसरे , प्रेम किशन जैन आणि निवृत्त सनदी अधिकारी रामाराव हे.

प्राधिकरणाचे सदस्य आहेत . अतिरिक्त महासंचालक ( आस्थापना ) या प्राधिकारणाचा सदस्य सचिव असतो . प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिले आहेत , त्यामुळे ते साक्षीदाराला समन्स पाठवू शकतात , त्यांची तपासणी करू शकतात , प्रतिज्ञापत्रावर साक्ष घेऊ शकतात . त्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाईची शिफारस करण्यात येते . प्रकार फार गंभीर असल्यास

त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शिफारसही हे प्राधिकरण करू शकते . त्यांच्या शिफारशीवर कारवाई न झाल्यास , संबंधित विभागाला लेखी स्वरूपात उत्तर प्राधिकरणाला द्यावे लागते . पोलिस कर्मचारी तथा अधिकारी यांचे विरुद्ध करण्यात येणाऱ्या तक्रारीसंदर्भात …… 1 ) कर्तव्य बजावण्यात हयगय वगैरे केल्याबद्दल विभागीय चौकशीद्वारे पोलीस दलातील दुय्यम दर्जाच्या व्यक्तीना शिक्षा करणे .. मुंबई पोलीस अधिनियम कलम 25 अन्वये . 2 ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करणे 3 ) राज्य मानव अधिकार आयोग यांचेकडे तक्रार दाखल करणे 4 ) राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण यांचेकडे तक्रार दाखल करणे 5 ) इंडियन पिनल कोड कलम 166 ते 171 अन्वये तक्रार दाखल करणे 6 ) मा . न्यायालयात तक्रार दाखल करणे . आपणास जर पोलिसांविरुद्ध तक्रार द्यायची असेल तर प्राधिकारणाचा पत्ता

अध्यक्ष , राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण , ४ था मजला , कुपरेज टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग , महर्षि कर्वे रोड , नरिमन पॉईंट , मुंबई 400 021

email_mahaspca @ gmail .com

022-22820045

अध्यक्ष , राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण , ४ था मजला , कुपरेज टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग , महर्षि कर्वे रोड , नरिमन पॉईंट , मुंबई 400 021 . email_mahaspca @ gmail .com

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *