सामाजिक सुरक्षा विभाग ,गुन्हे शाखा,पुणे शहर हडपसर परिसरात मटका अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची बदली झाल्यानंतर अवैध धंदे पोफावले आहेत,

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे शहरातील येरवडा व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असतानाही पोलिस ठाण्यातील वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदे फोफावली आहेत . त्या धंद्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे . सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , पुणे शहर येरवडा व हडपसर परिसरात मटका अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई करून एकुण १,१४,६६० / – रू .चा मुद्देमाल जप्त .

१ ) दि .२७ /०९ / २०२२ रोजी श्रीकृष्ण मंदिरा जवळ भाटनगर येरवडा परिसरात बेकायदेशीरपणे मुंबई मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीनुसार सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता , काही इसम बेकायदेशीर मुंबई मटका जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे असे १० इसमांना ताब्यात घेवुन , त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असे एकूण १८,५८० / – रू . किचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला :

सदर प्रकरणी नमुद १० इसम व पाहिजे इसम ०१ असे एकुण ११ इसमांविरूध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरनं . ४६६ / २०२२ , महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ ( अ ) अन्वये गुन्हा.नोंद करण्यात आला असून , त्यांना पुढील कारवाई करीता येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे …

२ ) तसेच दि .२८ /०९ / २०२२ रोजी शिवशक्ती चौक , गंगानगर रोड , साईस्वरा कॉम्पलेक्सच्या बाजुला असलेल्या दुकानामध्ये गाळा नं .४ चे पडवी मधे मोकळ्या जागेत फुरसुंगी हडपसर परिसरात बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमी नुसार सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी छापा टाकला असता , काही इसम बेकायदेशीर कल्याण मटका जुगार व पणती पाकोळी सोरट जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे १० इसम मिळुन आले . त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असे एकूण ९५,८१० / – रु किंचा मुद्देमाल घटना स्थळावरून जप्त करण्यात आला

सदर प्रकरणी नमुद १० इसमांविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं . १२३० / २०२२. महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ ( अ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला

असुन त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे . सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची बदली झाल्यानंतर अवैध धंदे फोपावले आहेत ,

शहरातील अवैद्य आश्रय देणाऱ्या अधिकाऱ्यावर जोरदार कारवाई करणारे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर हे हडपसर येथील अवैध धंद्यांना प्रोत्साहित देणारे पी आय व वसुली किंग. , यांच्यावरती कारवाई करतील का,? असा प्रश्न उद्भवत आहे,

मंत्री मार्केेट, पाठीमागे व इतर ठिकाणी अवैध धंदे सर्रासपणे सुरू असताना देखील ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत आहे. हडपसर हद्दीबाबत स्थिती दिसत असतानाही पोलिसांच्या डोळ्यादेखत हा प्रकार चालतो त्यामुळे या बेकायदेशीर अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ आहे असे म्हणण्यात काहीही खोटे नाही,?

पोलीस आयुक्त डॉ.अमिताभ गुप्ता यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा येथील अवैध धंदेवाल्यांचे धाडस वाढून मोठे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. हडपसर व वसुलीवाले, पोलिसांचा चाललेला हा खेळ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर हे,पी,आय,व वसुली वाले यांच्या वरती कारवाई करतील का, हा मोठा प्रश्न निर्माण नागरिकांना उपस्थित होतो आहे.???

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *