कोंढवा बुद्रुक,आंबेडकर नगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम;Anti Corruption Squad NGO कडून कारवाईची मागणी,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे : कोंढवा बुद्रुक सर्वे क्रमांक १३ परिसरातील आंबेडकर नगरजवळ बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित ठिकाणी एका बिल्डरकडून कोणत्याही अधिकृत परवानग्यांशिवाय बांधकाम सुरू असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बांधकामासाठी ना महसूल खात्याची, ना गौण खनिज/उत्खननाची, तसेच पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही बिल्डर कमी किमतीत फ्लॅट विक्री करून नंतर जबाबदारी टाळतात. भविष्यात इमारतीसंदर्भात कोणतीही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.या अनधिकृत बांधकामामुळे परिसरातील पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज आणि पार्किंगसारख्या मूलभूत सुविधांवर ताण निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या प्रकरणी Anti Corruption Squad NGO चे ऑल इंडिया अध्यक्ष वाजिद खान यांनी महसूल विभाग व पुणे महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली असून संबंधित बिल्डरांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच, काही बिल्डर “सर्वांना मॅनेज करतो, आमचं कोणी काही करू शकत नाही” अशी भाषा वापरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नागरिकांची प्रमुख मागणी :
बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवावे
संबंधित बिल्डरांवर गुन्हे दाखल करावेत
जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी,
