लाच देण्यापेक्षा लाच घेण्याचेच प्रकार जास्त.

ACS POLICE CRIME SQUAD

लाच देण्यापेक्षा लाच घेण्याचेच प्रकार जास्त : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली माहिती.

२०१२ मध्ये लाच देणा-याला झाली शिक्षा.

११ वर्षात फक्त १० केसेस दाखल, माहिती अधिकारात माहिती आली समोर.

ACS POLICE CRIME SQUAD

पुणे २९/११/२०२१: प्रतिनिधी. लाच देण्यापेक्षा घेण्याचेच प्रकार जास्त असल्याचे माहिती अधिकारात (RTI) आलेल्या माहितून समोर आले आहे. आज शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राजरोसपणे लाच मागितली जात असल्याचे आपणास ऐकण्यास व पाहण्यास मिळत आहे. शासकीय कार्यालयात कामे न करता ती प्रलंबित ठेवून लवकर कामे करून देण्यासाठी थेट लाच मागितली जाते, परंतु सन २०११ ते २०२१ पर्यंत १० जणांनी स्वता शासकीय लोकांना लाच देण्याचा प्रयत्न केला आहे.

म्हणजे साधारणता वर्षाला एक” किंवा २ गुन्हे दाखल होत असतात? म्हणजे शेकडो लाच घेणाऱ्या भ्रष्टाचा-यांमागे एक-दोन लाच देणारे आहेत.काहि महिन्यांपूर्वी पुणे शहर तहसिलदारांना लाच दिल्याप्रकरणी एका वाळू व्यावसायिकावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाच दिल्याची घटना घडल्यावर पुणे शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे सिटी टाईम्सने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे स्वता नागरिकांनी शासकीय लोकांना लाच दिल्याची नोंदणीची माहिती(RTI) मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीतून सन २०१२ मध्ये एका नागरिकाला शिक्षा झाली आहे तर २०१६ मध्ये १ गुन्हा दाखल तर सन २०१७ मध्ये २ व २०१८ मध्ये २, आणि २०२० मध्ये १ असे गुन्हे दाखल असून सध्या ते न्यायप्रविष्ट आहेत. तसेच २०२१ मध्ये खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास चालू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाने कळविले आहे. यातून असे दिसून येते की क्वचितच नागरिक स्वताहून लाच देतात तर नागरिकांकडूनच शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जाते हे आता स्पष्ट झाले आहे.?

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *