घरफोडी व वाहनचोरी करणा – या सराईत गुन्हेगारास विमानतळ पोलीस स्टेशन पोलीसांनी केले जेरबंद .

विमानतळ पोलीस स्टेशन ची कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD

प्रेसनोट ता . ०२/१२/२०२१ घरफोडी व वाहनचोरी करणा – या सराईत गुन्हेगारास विमानतळ पोलीस स्टेशन पोलीसांनी केले जेरबंद .

विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस कर्मचारी पोलीस नाईक अंकुश जोगदंडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये खंडोबामाळ लोहगाव या ठिकाणी घरफोडी केलेला इसम म्हाडा कॉलनीचे शेजारील मोकळ्या मैदानात रोड लगत थांबलेला आहे . त्याने अंगामध्ये चेक्सचा शर्ट घातला असुन डोक्याला लाल रंगाची पगडी बांधलेली आहे . अशी माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव यांना कळविली असता , त्यांनी शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकातील सहा . पोलीस फौजदार अविनाश शेवाळे यांनी व तपास पथकातील स्टाफसह सापळा लावुन बातमी मधील वर्णनाचे इसम नामे टारझनसिंग चंदासिंग भोंड वय २२ वर्ष , रा . गल्ली नंबर १० , पाटील इस्टेट झोपडपट्टी , जुना पुणे मुंबई रोड , शिवाजीनगर , पुणे यास शिताफिने ताब्यात घेतलेले होते . नमुद इसमाकडे विश्वासात घेवून तपास करता खंडोबामाळ लोहगाव , पुणे येथे घरफोडी केली असल्याचे कबुल केल्याने त्यास विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं. ६६/२०२१ भादंविक ४५४ , ४५७ , ३८० या दाखल अटक करण्यात आले होते .

दाखल गुन्ह्याचे पोलीस कस्टडी दरम्यान गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिणे आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेले आहेत . तसेच नमुद आरोपी हा घरफोडी चोरी करण्याकरीता मोटार सायकलचा वापर करीत होता व त्यासाठी त्याने पुणे शहर व पिंपरी चिंचवड परीसरातुन एकुण ०६ दुचाकी वाहने चोरी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन , चोरी केलेली ०६ दुचाकी वाहने आरोपी यांचेकडुन हस्तगत करण्यात आलेली आहेत . आरोपीकडुन हस्तगत केलेल्या दुचाकी वाहना बाबत विमानतळ पोलीस स्टेशन येथे ०४ गुन्हे दाखल असुन , पिंपरी पोलीस स्टेशन व भोसरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे . नमुद आरोपी याचेकडुन एकुण २,१०,००० रुपये किंमतीची ०६ दुचाकी वाहने व सोन्याचे दागिणे असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .

सदरची कारवाई ही मा . श्री . नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर ,

मा . श्री . रोहीदास पवार , पोलीस उपायुक्त परि.- ०४ पुणे शहर , श्री किशोर जाधव सहा . पोलीस आयुक्त , येरवडा विभाग पुणे शहर , यांचे आदेशान्वये श्री भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर व श्री मंगेश जगताप पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस फौजदार अविनाश शेवाळे , सपोफौ गणेश साळुंखे , पोहवा रमेश लोहकरे , पोना सचिन जाधव , पोना रुपेश पिसाळ , पोना अंकुश जोगदंडे , पोना गिरीश नानेकर , पोना विनोद महाजन , पोना शिवराज चव्हाण , पोना हारुण पठाण , पोशि नाना कर्चे यांचे पथकाने केली आहे .

भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस ठाणे पुणे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *