समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने १२ तासाच्या आत चोरांना केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दिनांक – १३/०८/२०२१ समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर दुचाकी चोरास समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाने १२ तासाच्या आत केली अटक वाहन चोरीचे दोन गुन्हे उघड

PUNE CRIME NEWS दि .१२/०८/ २०२१ रोजी फिर्यादीने त्यांची हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटार सायकल चोरी झालेबाबत तक्रार दाखल केली होती .

समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीला प्रतिबंध होणेकामी व वाहन चोर पकडणेकामी वाहन चेकींग करीत असतांना एक इसम मित्तल कोर्ट जवळ सार्वजनिक रोडवर होंडा पॅशन दुचाकीवर आला असता त्याचे गाडीला चावी दिसून आली नाही . त्याचेकडे गाडीचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता तो असमाधान कारक व उडवाउडवीची उत्तरे देवु लागला म्हणुन त्यास त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले

नाव मयुर मोतीराम राठोड , वय २३ वर्षे , रा . स.नं. १० , गणेशनगर , सिध्देश्वर मंदीराजवळ , येरवडा पुणे असे असल्याचे सांगितले . त्यास अधिक चौकशी कामी समर्थ पोलीस स्टेशन येथे आणले व सदर गाडीचा आर.टी.ओ.नंबर एम.एच. १२ डीएम ९ ०५८ असे असल्याचे निष्पन झाल्याने सदर गाडीबाबत अभिलेख पडताळुन खात्री केली असता समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४०/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असलेचे समजले . त्याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरची गाडी मालधक्का चौक , आंबेडकर भवन मंगळवार पेठ पुणे येथून चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीस दाखल गुन्हयात अटक केली आहे .

सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक सुभाष पिंगळे हे करीत आहेत . तसेच त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने १० दिवसापूर्वी येरवडा येथून एक होंडा शाईन मोटार सायकल चोरी केलेबाबत सांगीतले आहे . सदर गाडीबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे अभिलेख पडताळुन खात्री केली असता येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३७५/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असलेचे समजले . सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर शरीराविरुध्दचे वाहन चोरीचे एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD

सदरची कामगिरी ही मा.डॉ.संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा.श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -१ , पुणे शहर , मा.श्री.सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे , श्री.विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो . स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा.पोलीस निरीक्षक संदीप जोरे , पोलीस अंमलदार संतोष काळे , सुशील लोणकर , सुभाष पिंगळे , सुमित खुट्टे , सुनिल हसबे , विठ्ठल चोरमले , निलेश साबळे , महेश जाधव , सुभाष मोरे , हेमंत पेरणे , शुभम देसाई , नितीन घोसाळकर , जितेंद्र पवार , श्याम सुर्यवंशी , यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *