कर्तव्यावर असलेल्या होमगार्डशी वाद घालणाऱ्या कथीत पत्रकारावर गुन्हा दाखल कराड शहरातील
ACS POLICE CRIME SQUAD
प्रेस नोट दि .०५ / ०६ / २०२१ . कर्तव्यावर असलेल्या होमगार्डशी वाद घालणाऱ्या कथीत पत्रकारावर गुन्हा दाखल कराड शहरातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरीता मा.जिल्हाधिकारीसो सातारा यांचेकडील आदेशाचे तंतोतंत पालन करण्याकरीता कराड शहर पो.ठाणे हद्दीत सैदापूर कॅनोल , विजयदिवस चौक , भेदा चौक , कोल्हापूर नाका , कार्वे नाका , व ढेबेवाडी फाटा याठिकाणी नाकाबंदी बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत . तसेच शहरामध्ये विनाकारण फिरू नये म्हणून बीट मार्शल पेट्रोलिंग नेमण्यात आलेले आहे . गल्ली बोळातील व मुख्य रस्त्यावरील काही दुकानदार व विक्रेते नियमाचे उल्लंघण करून विक्री करत असल्याने त्यास प्रतिबंध करण्याकरीता खाजगी वेशातील अधिकारी व अंमलदार यांची दोन गोपनीय पथके तयार करणेत आलेली आहेत . कराड शहर पो.ठाणे कोराणा संसर्ग रोखण्याकरीता चोख बंदोबस्त असून नियमाचे उल्लंघण करणाऱ्या दुकानदारांचेवर दंडात्मक कारवाई करून व दंड न भरल्यास गुन्हे दाखल करून दुकाने सील करण्यात आलेल्या आहेत . तसेच शहरात विनामास्क फिरणाऱ्या लोकांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे . पोलीसांचे सोबत होमगार्ड सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करत आहेत . दि .०३ / ०६ / २०२१ रोजी सकाळी ११.३० वा . सुमारास कर्मवीर पुतळ्या जवळ होमगार्ड शुभम महापुरे यास कर्तव्य नेमण्यात आलेले होते . सदर ठिकाणी कर्तव्य बजावत असताना दत्त चौक येथुन एस.टी.स्टॅण्ड जाणारे रोडचे बाजूने मोटार सायकलवरुन दोन इसम आले मोटार सायकल चालविण्याऱ्या इसमाने मास्क लावला नव्हता व सदर मोटार सायकलवर SK क्राईम न्युज असे लिहलेले होते . होमगार्ड महापुरे यांनी मोटर सायकल चालकास मास्क का लावला नाही , असे विचारले असता मी पत्रकार आहे . असे म्हणून हुज्जत घातली . सदर बाबत होमगार्ड महापुरे याने आपल्या मोबाईलमध्ये व्हीडीओ केला असता . SK क्राईम न्युज संतोष कदम याने त्यांचे हातातील मोबाईल हिसकावून त्यांचे अंगावर धावून गेला . सदर बाबतची माहिती कराड शहर पो.ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील साहेब यांना मिळाली . त्यांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी जावून कर्तव्यावर असलेले होमगार्ड शुभम महापुरे यांचेकडून माहिती घेतली . होमगार्ड शुभम महापुरे याने दिलेल्या तक्रारीनुसार तथाकथित पत्रकार संतोष कदम उर्फ एस.के.मामा याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे . सदर बाबत कराड शहर पोलीस ठाणे गुरनं ३३५/२०२१ भा.दं.वि.स. कलम .३५३,१८८,२६ ९ सह महाराष्ट्र कोविड १ ९ अधिनियम २०२० चे कलम ११ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ए प्रमाणे दाखल आहे . सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मारुती सराटे हे करत आहेत .
ACS POLICE CRIME SQUAD 9822331526
» पोलीसांकडून आवाहन : सध्या महाराष्ट्रात कोरोणा विषाणू संसर्गाने थैमाण घातलेले आहे . सदरचे संक्रमण तोडण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालण करा . प्रशासन / पोलीस / होमगार्ड यांचेशी सौजन्याने वागावे . प्रशासनास सहकार्य करावे . सोशल डिस्टन्सचे पालण करावे . संचारबंदी आदेश लागू असल्याने घरा बाहेर पडू नये . दुकानदार व व्यापारी यांनी मा . जिल्हाधिकारी साो , सातारा यांनी घालून दिलेल्या नियमांचे व अटींचे पालन करावे . घरात रहावे सुरक्षित रहावे . कराड शहर अगर परिसरात असे नियम भंग करतांना मिळून आल्यासे त्यांचेवर कारवाई करणेत येईल याची दक्षता घ्यावी .
ACS POLICE CRIME SQUAD WAJID S KHAN